चेतन निंबोळकर यांना खान्देश गौरव पुरस्कार जाहीर

0
जळगांव(प्रतिनिधी)– आदिल शहा फारूकी बहुउद्देशीय संस्थेद्वारे दिला जाणारा खान्देश गौरव पुरस्कार या वर्षी सत्यमेव जयते चे जिल्हा विशेष प्रतिनीधी तथा सामाजिक कार्यकर्ते चेतन जनार्दन निंबोळकर यांना जाहीर झाला आहे. त्यांनी केलेले उत्कृष्ट समाजकार्य व जनसेवेची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
संस्थेचे अध्यक्ष फारुक शाह नौमानी चोपडा या पुरस्काराची घोषणा केली. महाराष्ट्रातील सामाजिक, शिक्षण, साहित्य, पत्रकारीता, क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. पुरस्कार वितरण समारंभ शनीवार(८ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.