चिनावल शिवारात अज्ञात व्यकिचा मृतदेह आढळला

0

रावेर : तालुक्यातील चिनावल येथील शेतकरी विलास मिठाराम भारंबे तसेच ग्रा.प. सदस्य सागर भारंबे यांचे वाघोदा रावेर रस्त्यावरील सुकी नदीच्या मोठ्या पुलाजवळील मळ्यातील विहीरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे.

सदर बाबत चिनावलचे पोलीस पाटील निलेश नेमाडे यांनी सावदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून विलास भारंबे सागर भारंबे यांच्या विहिरीत कोणीतरी अज्ञात इसम पडल्याचे नमूद केल्याने या अज्ञात व्यक्तीस सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंके पोलीस नाईक सुरेश अढायगे योगेश सावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन बाहेर काढून पंचनामा करून जागेवरच शवविच्छेदन केले. याबाबत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू 174, 12 / १९ प्रमाणे नोंद करून अज्ञात व्यक्तीचा मृतदेह  कुजल्या ने सदर इसम पाच फुट दोन इंच जाडसर अंगात आकाशी निळ्या रेघांचा चौकडीचा शर्ट काळे पॅन्ट त्यावर त्याचे उजव्या हातावर काबेवर  ओम गोंधलेले आहे.  अशा वर्णनाचा आहे सदर बाबत सावदा पोलिस स्टेशनचे सपोनि राहुल वाघ व कर्मचारी पुढील तपास करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.