चिनावल येथे स्वच्छतेचा अभाव,गटारी तुंडूंब तर अनेक पथदिवे बंद

0

फैजपूर प्रतिनिधी: चिनावल येथे बऱ्याच ठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे.जिल्ह्यात कोरोना संकट समोर असताना सुद्धा ग्राम पंचायत मार्फत सफाई करण्यात येत नसल्याचे चित्र दिसत आहे.शासनाचा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळविणार्या गावाची वस्तुस्थिती मात्र खुप वेगळी आहे.प्रामुख्याने जामा मशीद परिसर,जि प उर्दूशाळेच्या मागील बाजूस तसेच मैमुना मस्जिद जवळ घाण पसरलेली दिसून येत आहे कोरोना मुळे धार्मिक स्थळे बंद असले तरी त्याठिकाणी स्वच्छता राखणे महत्वाचे आहे परंतु असे होताना दिसत नाही.

सुमारे दीड डझनभर खांबांवरील पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना अंधारात वापरावे लागत आहे.या बाबत ग्राम पंचायत मधे मुस्लीम पंच कमिटी अध्यक्ष हाजी हयात रवान,कौमी एकता फाऊंडेशन चे ईरफान हाजी कुतबोददीन यांनी वेळो वेळी तोंडी व लेखी निवेदन देऊन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना समक्ष भेटून सुद्धा कोणतीही पाऊलं उचलली गेली नाहीत.

येथील वार्ड नं ४ व ५ या भागात मुस्लिम समाजाची वोटिंग भरपुर आहे तरी या वार्डातले नागरिक चिनावल चे रहिवाशी नाही का? आम्ही ग्राम पंचायत मध्ये तोंडी व लेखी तक्रार देऊन देऊन थकून गेले आहेत तरी पण आमची काही समस्या मार्गी लावली नाहीत आता सरकार ने माझी वसुंधरा अभियान दिले आहे तरी सुद्धा या अभियाना मध्ये ही आम्हाला काही जागा नाही.माजी सरपंच जे होते त्यांनी ६ ईंची पाईपलाईन मंजूर करून बील पास केले होते आणि त्या नंतर ते पाईपलाईन राहून गेली व त्यांचा कार्यकाळ संपून गेला आणि ते पाईपलाईन राहुन गेली ते आता पर्यंत पुर्ण झालेली नाही ४ नं वॉर्डात वस्ती ( लोकसंख्या) वाढल्या मुळे पाणी पुरवठा पुर्ण होत नाही १४ एप्रिल पासून पवित्र रमजान महीना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आला नाही

जागो जागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे या मुळे मच्छरांची जास्तीत जास्त प्रमाणात उत्पती होत आहे.या पवित्र रमजान महीन्या मध्ये मुस्लिम बांधव रोज सकाळी ३ वाजे पासून सहेरी साठी उठतात तरी त्यांच्या घरा समोर अंधार असतात. वार्ड नं ४ ५ या मध्ये खालील १४ लाईट २ महीने पासून बंद आहे या प्रमाणे मुशताक रीक्शा,खालीक मिस्त्री,अशफाक लकड़ी,कामील मिस्त्री,रीयाज़ जमादर,बड़ के निचे पठान वाड़ी,सादीक  सेठ ,अलताफ़ मुन्शी जुना घर,दीलावर पठान पाटील वाड़ा,जहांगीर मौलाना,नवा पूल,मदरसा 3 लैट,नय्यर ईकबाल जुना बौद्ध वाड़ा। या १४ खांबांची २ महीन्या पासून बत्ती गुल आहे.

अनेक ठिकाणी गटारी तुडूंब भरलेल्या आहे व रोडवर पाणी वाहत आहे काही ठिकाणी गटारी चे ढापे तुटले आहे सर्व गावात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत कामे होत आहे.पण या अभियाना अंतर्गत ४ व ५ मध्ये काही काम होत नाही.असे नाही की ग्राम पंचायत सोबत आमची काही दुश्मनी आहे. आम्हाला फक्त आमचा जो शासनाने आम्हाला हक्क दीला आहे तो आम्हाला पाहीजे दुसरे काही नाही अशी कैफियत यावेळी चिनावल येथील कौमी एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान मेंबर व मुस्लीम पंच कमेटी अध्यक्ष हाजी हयात खान यांनी  मांडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.