निःस्वार्थ भाव सेवेनंतर वाणिज्य शाखेचे प्रा. आर. जी. पाटील सेवा निवृत्त

0

शेंदुर्णी: धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अप्पासाहेब र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णीच्या कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य आणि वाणिज्य शाखेचे प्रा. आर. जी. पाटील हे आपल्या ३२ वर्षाच्या प्रदीर्घ निःस्वार्थ सेवेच्या व्रतातून आज रोजी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि जिल्हा नियोजन समितीचे चेअरमन संजय दादा गरुड, सचिव सतिशजी काशिद  सहसचिव दिपक गरुड, महिला संचालिका सौ. उज्वलाताई काशिद,  जेष्ठ संचालक  सागरमलजी जैन, . यु. यु. पाटील, इ. च्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त झालेत आणि त्यांचा सपत्नीक सौ उषाताई पाटील यांच्यासह संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

प्रा. आर. जी. पाटील यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे अध्यक्षपदी संस्थेचे चेअरमन  संजय दादा गरुड हे होते, त्यांनी आपल्या मनोगतातून प्रा. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी संस्था आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून दिलेले योगदान, त्याबरोबरच क्रीडाशिक्षक म्हणून असलेली शिस्त विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे कार्य एक आदर्श शिक्षक म्हणून केले आहे, त्यांचे हे कार्य संस्था नेहमीच स्मरणात ठेवीन आणि भविष्यात नेहमीच संस्था आपल्या मदतीसाठी तत्पर असेल हेही नमूद केले.

तसेच संस्थेचे सचिव  सतिश काशिद यांनी आपल्या मनोगतातून प्रा. पाटील यांच्या निःस्वार्थ सेवेचा आणि प्रामाणिक पणाचे कौतुक करतांना प्रा. पाटील यांनी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा भक्कम पाया रचण्याचे काम, कोणताही गाजावाजा न करता आपले काम प्रामाणिकपणे करण्याचे कार्य त्यांनी केले त्यांच्या या योगदानाबद्दल संस्था नेहमीच लक्षात ठेवेल, तर  संस्थेचे जेष्ठ संचालक मा. श्री. सागरमलजी जैन यांनी प्रा. पाटील यांच्या नियुक्तीपासून तर निवृत्तीपर्यंतचा प्रवास थोडक्यात मांडला आणि त्यांच्या निःस्वार्थ सेवेचा प्रवास साध्याच्या आधुनिक स्थितीत इतरांना आदर्श देणारा असेल असे त्यांनी नमूद  केले.

याप्रसंगी प्रा. पाटील यांनी आपल्या मनोगतातून त्यांचा सेवाव्रताचा प्रवास त्याप्रवासात संस्था परिवारातील सर्व पदाधिकारी, प्राचार्य, सहकारी प्राध्यापक आणि शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सहकार्य त्याबद्दल ऋण व्यक्त केले आणि गरीब विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना महाविद्यालयीन गणवेश घेता यावा म्हणून रुपये दहा हजार रुपये देणगी स्वरूपात दिलेत.

याकार्यक्रमाचे प्रस्तविक प्राचार्य डॉ. वासुदेव र. पाटील यांनी प्रा. पाटील यांच्या कार्याचा गौरव, त्यांची शिस्तप्रियता आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा गौरव त्यांनी आपल्या प्रस्ताविकातून केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ श्याम साळुंखे, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. महेश पाटील डॉ. योगिता चौधरी यांनी प्रा. पाटील यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ दिनेश पाटील यांनी केले तर आभार प्रा. अप्पा महाजन यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.