चिखलमय ‘कंबरतोड’ रस्त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाश्याची होतेय होरपळ !

0

वाकोद, ता. जामनेर : (अजय लोढा, वाकोद)

जळगाव – औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरण रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अतिशय संथ गतीने सुरु असून त्यात हा रस्ता दुतर्फा खोदुन ठेवल्याने वाहनधारकाना ताप आणि त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गा वरील वाकोद ते पहुरयादरम्यान रस्त्याचे दुतर्फा काम सुरू आहे. या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळेप्रवाश्याना,वाहनधारकांना तसेच दुचाकीधारकांनासंकटाचा मोठा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून खोदुन ठेवालेल्या

ठिकाणी अत्यंत खराब दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी मातीच्या चिखला मुळे वाहनचालविने मोठे जिकरी चे बनले आहे. तसेच या रस्त्यावर ठीक ठिकाणी मोऱ्या बनविण्याचेकाम सुरू असून खोदुन ठेवलेल्या रस्त्या मुळे वाहतूक सुरळीत चालावी यासाठी कच्चा

रस्ता तयार करण्यात आला आहे मात्र या कच्च्या रस्त्यावरून दिवसरात्र वाहतुकीचीवर्दळ सुरू असते. कच्चा स्वरूपाचा रस्ता असल्याने व नेहमीच्या वर्दळीमुळे यारस्त्यावरून रहदारी करणाऱ्या वाहनांना देखील या तसेच लहान मोठ्या अपघाताच्याप्रमाणात मोठी वाढ झालेली आहे नेहमी या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरु असते यारस्त्यावरून दररोज ये-जा करणार्या मध्ये याचे प्रमाण वाढत चालले आहे सध्याअसलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 15 ते 20 फुटांपर्यंत मुरूम व माती टाकून वाढीव रस्त्याचे काम करण्यात आले.

आहे तसेच या रस्त्यावर सतत मातीची धुळ लांबच लांब उडूत आहे यामुळे शेतातील पिकेखराब होऊन शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे मात्र याचे कोणतेही सोयरे सुतकसबंधित थेकेदाराला किंवा लोकप्रतिनिधीना नसल्याचे दिसत आहे.

व्ही.आय.पीवाहनांची बैलगाडी पेक्षाही वाईट स्थिती : सर्वदूर रस्ता रुंदीकरणाचे काम सध्यासुरू असून गेल्या अनेक महिन्यापासून येथील रस्ते संबंधित ठेकेदार यांनी खोदूनठेवलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे तसेच वर खाली रस्ते असून यारस्त्यावर वर्दळीचे प्रमाण अधिक असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महागड्यातसेच व्हीआयपी वाहनांची स्थिती बिकट झालेली आहे या रस्त्यावर गाडी चालवणे मोठेजिकरीचे बनलेले आहे बैलगाड्या पेक्षाही वाहनांची स्थिती अत्यंत बिकट झालेली असूनरस्त्यांच्या ते ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे कामामुळे वाहनांचे मोठे नुकसान होतआहेत यामुळे वाहन धारकांकडून तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तसेच यामुळे तासन्तास यारस्त्यामुळे व्यर्थ जात असल्याने वाहनधारक कमालीचे हैराण झालेले आहे तरीदेखील एकबाजू का होईना वाहनधारकांसाठी तयार करण्यात यावी व रहदारी सुरळीत करावी अशी मागणीहोत आहे.

*करावा लागतोयअडचणीचा सामना : जळगाव औरंगाबाद महामार्गा वरुन नेहमी वर्दळ असते या रस्त्यावरूनजगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी नेहमी देशी विदेशी पर्यटकांची नेहमी गर्दीअसते तसेच औरंगाबाद येथे विमानतळ, हायकोर्ट तसेच पर्यटन स्थळे असल्याने याठिकाणी जळगाव जिल्ह्यासह आजूबाजू च्या जिल्ह्यातुन अनेक व्ही आय पी व्यक्ति तसेचराजकीय मंडळीची देखील या रस्त्यावरून नेहमी ये जा करीत असतात यांना देखील याअडचणीचा सामना करवा लागत आहे. खड्ड्यांत रस्ता कि रस्त्यात खड्डा अशी अवस्था असतांना प्रशासन या कडे डोळेझाक करीत आहे वाहनधाकरांनानाहक खड्ड्यांसह ‘कंबरतोड’ रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

*पिंपळगाव-वडगाव रस्त्याने वाढली वर्दळ – पहुर ते वाकोद दरम्यान रस्त्याची मोठीदुरवस्था झाल्याने जळगाव औरंगबाद प्रवास करणारे सध्या वाकोद वडगाव-पिंपळगाव मार्गेपहूर असा प्रवास करीत आहे शनिवार पासून सलग तिन दिवसापासून पाऊस सुरू असून सोमवार रोजीपहुर वाकोद रस्त्यावर चिखला मध्ये गाडी अडकल्याने दुतर्फा वाहतुक खोळबंली होती यामुळेवडगाव मार्गे वाहनांची मोठी वर्दळ वाढलेली होती लहान वाहनाना या रस्त्यावर चालने जिकरीचेबनले आहे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून थेकेदार मात्र याकडे दुर्लक्ष करीतआहे तात्काळ या रस्त्त्यावर उपायोजना करावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.