आण्णा भाऊ साठेचा आदर्श समाजाने घ्यावा ; ना.गुलाबराव पाटील

0

धरणगाव :- येथे नगरपालिका सभागृहात लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान यावेळी आयोजित कार्यक्रमात सहकार राज्य मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतात आण्णा भाऊ साठेचा आदर्श समाजाने घ्यावा व त्याचे विचार आचरणात आणावे, असे प्रतिपादन केले. यावेळी सर्वप्रथम आण्णा भाऊ साठे याचं प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते व मातंग समाज बांधवांचा हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी उपस्थित उपनगराध्यक्ष अंजली विसावे, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, विजय महाजन, गटनेते पप्पू भावे, मा नगराध्यक्ष सुरेश चौधरी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, मुख्याधिकारी श्री.पवार, भाजपा गटनेते कैलास माळी, नगरसेवक सुरेश महाजन, विलास महाजन, जितू धनगर, भागवत चौधरी, अजय चव्हाण, गुलाब मराठे, ललित येवले, चर्मकार समाजाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, शहर संघटक धिरेंद्र पुरभे, नपा लिपिक संजय मिसर चौधरी, भाऊसाहेब अविनाश चौधरी, पप्पू चौधरी व मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले, तर आभार जयेश महाजन यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.