चाळीसगाव महाविद्यालयात उन्मेष, महिला विशेषांक नियतकालिकेचे प्रकाशन

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) : चाळीसगाव येथे  महाविद्यालयाचा अंक हा त्या महाविद्यालयाचा संपूर्ण दर्शन घडवणारा असतो. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आपण  केलेल्या कार्याचा लेखा जोखा हा उन्मेष या अंकात असणार आहे म्हणून आपण हा अंक आपल्याजीवनात संग्रही केला पाहिजे. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद बिल्दीकर यांनी  महाविद्यालयाचे नियतकालिक उन्मेषअंक प्रकाशन प्रसंगी केले.

जागतिक महिला दिनाचे  औचित्य साधुन  चाळीसगाव येथील बी.पी.आर्टस. एस एम ए सायन्स, व के के सी  कॉमर्स  व के आर कोतकर महाविद्यालयाचे नियतकालिक ” उन्मेष ” प्रेरणादायी महिला विशेषांक  चे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांचे शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.पी.एस.बाविस्कर, कार्यालयीन अधिक्षक श्री.हिंमत अंदोरे , उन्मेष नियतकालिकाचे संपादक डी. एल. वसईकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापकांचा “जागतिक महिला दिन” निमित्त सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. बिल्दीकर यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाचा अंक हा त्या महाविद्यालयाचा संपूर्ण दर्शन घडवणारा असतो. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आपण  केलेल्या कार्याचा लेखा जोखा हा उन्मेष या अंकात असणार आहे म्हणून आपण हा अंक आपल्याजीवनात संग्रही केला पाहिजे तसेच आज जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतो. जागतिक महिला दिन सन्मान देण्यासाठी महिला सशक्तीकरण आणि मुला-मुलींमधील भेदभाव दूर करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्तविक  प्रा.डी.एल. वसईकर यांनी केले. तर  उपप्राचार्य डॉ.पी.एस.बाविस्कर यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधु भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी सोशल डिस्टन्सचे पालन करून  कोविड चे सर्व नियम पाळून उपस्थित  होते.

Leave A Reply

Your email address will not be published.