यावल पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भाजपाचे योगेश भंगाळे यांची ईश्वरीय चिट्टीव्दारे निवड

0

यावल (प्रतिनिधी) :येथील पंचायत समितीच्या उपसभापतीपदी यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली .आज दिनांक ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या १ मार्च रोजी प्राप्त झालेल्या आदेशानुसार यावल पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी २ वाजता उपसभापती निवडीची प्रक्रीया निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील व महसुलचे दिपक भुतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या सर्वसाधारण सभेच्या पुर्वी उपसभापती पदासाठी  भारतीय जनता पक्षाच्या वतीने योगेश दिलीप भंगाळे यांचा एकतर कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कलीमा सायबु तडवी आणी सरफराज तडवी यांचे प्रत्येकी एक असे एकूण ३नामर्निर्दशन अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी महेश पवार यांच्याकडे प्राप्त झाले होते.

या पंचायत समितीमध्ये सत्ताधारी गटाचे भारतीय जनता पक्षाचे चार आणी काँग्रेस पक्षाचे चार असे सरसम्मान सदस्य संख्याबळ असुन , विद्यमान प्रभारी सभापती दिपक अण्णा पाटील यांनी आपल्या उपसभापतीपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर आज निवड करण्यात आली , दरम्यान यावल पंचायत समितीत योगेश भंगाळे , दिपक भास्कर पाटील , लक्ष्मीबाई विजय मोरे , सौ .पल्लवी पुरूजीत चौधरी असे चार सदस्य असुन कॉंग्रेस पक्षाचे उमाकांत रामराव पाटील, शेखर सोपान पाटील , सरफराज सिकंदर तडवी ,कलीमा सायबु तडवी हे सदस्य आहेत. या वेळी उपसभापतीच्या निवड प्रक्रीयेत पंचायत समिती सदस्य सरफराज सिकंदर तडवी यांनी आपला उमेदवारीचे अर्ज मागे घेतल्याने दोन अर्ज राहीले असता मतदान घेण्यात आले योगेश भंगाळे यांना ४ मते तर कलीमा सायबु तडवी यांना ही चार मते मिळाल्याने सरसन्मान मते मिळाल्याने अखेर ईश्वरीय चिट्टीद्वारे प्रेम देवरे यांनी काढतेल्या चिठ्ठीद्वारे योगेश भंगाळे यांची निवड करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.