चाळीसगाव नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा शहरवासीयांची मागणी

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहराची लोकसंख्या सव्वा लाखाहून अधिक असून येथील नगरपालिका ब वर्गात मोडते मात्र गेल्या एक वर्षापासून पालिकेत प्रभारी मुख्याधिकारी कामकाज पाहत आहे, त्यामुळे पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे, पालिकेतर्फे शहरात दोन मोठ्या योजनांचे काम सुरू आहे, त्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे,

तसेच संपूर्ण शहरात पाईप लाईनचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून ‌शहरातिल रस्त्याचे तीन-तेरा वाजले आहेत जनतेचे समस्या कोणी ऐकून घ्यायला तयार नाही शहरात मुख्य अधिकारी नसल्याने शहरवासीयांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत, घाणीची विल्हेवाट लावली जात नाही स्वच्छता होत नसल्याने धुळीचे प्रमाण वाढले यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे, शहरात भुयारी  गटार योजनेचे काम सुरू आहे  तसेच पाणीपुरवठ्याचे पाईफ लाईन चे काम  सुंध्दा मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्या ठिकाणची माती रस्त्याच्या बाजूने पसरलेली आहे, त्याकडे संबधीत ठेकेदार लक्ष देण्यास तयार नाही, नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने जनतेची तक्रारी कोणी ऐकून घेत नाही कायमस्वरूपी मुख्याधिकारी असावा अशी मागणी शहरवाशियाकडून होत आहे त्याबाबत चाळीसगाव तालुका पत्रकार मित्र मंडळाने जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा म्हणून विनंती अर्ज केला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.