चाळीसगावात हिस्र लाडग्याने पाडला बकरींचा फडशा,

0
चाळीसगाव :-(प्रतिनिधी)काही दिवसापूर्वी तालु्नयात बिबट्यांनी हैदोस घातला होता. आता या बिबट्यांचा त्रास थांबला असला तरी हिंस्त्र प्राण्यांचे उपद्रव सुरुच आहेत.शहरातील नेताजी पालकर चौक येथील रहिवासी असलेले बाळासाहेब सोनजी पवार यांची करगाव रोड धुळे रेल्वे लाईन जवळ शेती आहे. शेतात त्यांनी शेळीपालन सुरू केले आहे.  50 ते 60 शेळ्या त्यांनी पाळल्या आहेत. काल रात्री 3 च्या सुमारास जंगली हिंस्त्र प्राण्यांनी त्या शेळ्यांवर हल्ला करून 35 ते 40 शेळ्यांना ठार केल्या व इतर 5 शेळ्या जखमी झाल्या आहेत. या घटनेने करगाव रोड परिसरात भितीने गाळण उडाली आहे. हा हल्ला बिबट्याने केला असावी अशी चर्चा होती. मात्र हा हल्ला लांडग्यांनी केल्याची माहिती वनरक्षक राजेश ठोंबरे यांनी दिली.
    करगाव रस्त्यावरील रेल्वे लाईनजवळील शेतातील  हिंस्त्र प्राण्यांनी तब्बल 40 शेळ्या फस्त केल्याने शेतकरी बाळासाहेब पवार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.पवार यांनी  वनविभागाच्या धनंजय पवार यांना या घटनेची माहिती दिली. पवार यांच्यासह वनसंरक्षक मित्र राजेश ठोंबरे, पशुवैद्यकीय डॉ. आले यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीं शेळ्यावर उपचार केला.या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून वन विभगाकडून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन वनपरीक्षेत्र अधिकारी धनंजय पवार यांनी सांगितले.
     सागर पवार,बबडी शेख,अरुण पाटील, प्रशांत पवार, हेमंत बोरसे,अजिंक्य चौधरी, निलेश चौधरी, सचिन पवार शुभम पाटील आदि उपस्थित होते.
बिबट्याने जागवल्या आठवणी
करगाव रस्त्यावर शेतात बांधलेल्या बकऱ्यांवर हिंस्त्र  प्राण्याने केलेल्या हल्ल्यात 35 ते 40 बकऱ्या ठार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे बिबट्याच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. गेल्या तीन चार वर्षापासून बिबट्यांनी तालु्नयात हैदोस घातला होता.गिरणा पट्ट्यात तर बिबट्याची प्रचंड दहशत होती. नरभक्षक झालेल्या बिबट्याने सात जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे या बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. त्यानंतरही तालु्नयात बिबट्याचे भय संपले नव्हते. उंबरखेड, मेहूणबारे, लांबेवडगाव, पिंपरखेड शिवारात बिबट्याचे हल्ले सुरुच होते.अनेक शेळ्या, मेंढ्या, वासरू यांचा बिबट्याने फडसा पाडला होता. वन विभागाकडून तब्बल दोन बिबट्यांना सापळा लावून जीवंत पकडण्यात आले. त्यामुळे तालु्नयातील बिबट्याच्या भयापासून जनता मुक्त झाली असे वाटत असतांना काल करगाव शिवारात तब्बल 35 बकऱ्या हिंस्त्र प्राण्यंाच्या हल्ल्यात ठार झाल्याने बिबट्या तालु्नयात पुन्हा आला काय अशी भिती वाटून गेली. मात्र त्या शेळ्यांवरील हल्ले हे बिबट्याने नव्हे तर लांडगा या हिंस्त्र प्राण्याने केल्याची माहिती वन विभागाकडून मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.