‘चांद्रयान-2’चं आज प्रक्षेपण

0

श्रीहरीकोटा : चांद्रयान 2 च्या प्रक्षेपणाचं काऊंटडाऊन पुन्हा सुरु झालं आहे. आज (22 जुलै) श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी दोन वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान 2 चं प्रक्षेपण होणार आहे. इस्रोची महत्त्वाकांक्षी चांद्रयान 2 मोहीमेचं काऊंटडाऊन रविवारी (21 जुलै) संध्याकाळी 6.43 वाजता सुरु झालं.

‘जीएसएलव्ही मार्क ३’ प्रक्षेपकाच्या हेलियम टाकीतील दाब कमी झाल्याने चांद्रयानाचे उड्डाण १५ जुलै रोजी रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आज 22 जुलै रोजी दुपारी 2.43 मिनिटांनी चांद्रयान 2 चं लॉन्चिंग होईल, असं इस्रोने जाहीर केलं होतं. ड्डाणानंतर मोहिमेचे १५ टप्पे असून त्यात ४५ दिवसांच्या काळात हे यान चंद्राच्या कक्षेत जाईल. शेवटच्या १५ मिनिटांत चांद्रयान-२ तेथील दक्षिण ध्रुवावर घिरटय़ा घालत राहील व नंतर रोव्हरसह तेथे अलगद अवतरण करील.

Leave A Reply

Your email address will not be published.