घरफोडी करणार्‍या दोघांच्या मुसक्या आवळल्या

0

जळगाव :- अमळनेर,एमआयडीसी आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपीना एलसीबीच्या  पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 20 हजार रुपये किमतीचा एक मायक्रोमॅक्स कंपनीचा 32 इंची टीव्ही आणि 13 हजार आठशे रुपयांच्या 92 विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

याबाबत माहिती अशी कि , एमआयडीसी हद्दीतून 32 इंची टीव्ही चोरण्यात आला होता . त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी पथक तयार करून पथकातील सपोनि सागर शिंपी सफौ मनोहर देशमुख,मुरलीधर आमोदकर, रामचंद्र बोरसे , महेंद्र पाटील,विजय पाटील, नारायण पाटील,सुशील पाटील, बापू पाटील, गफूर तडवी, दादाराव पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने , नरेंद्र वारुळे, दीपक पाटील, प्रवीण हिवराळे , यांच्या पथकाने,अमळनेर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार शोधात असताना शांताराम उर्फ शाण्या प्रताप कोळी रा. हातेड ता. चोपडा , ज्ञानेश्वर छगन कोळी रा. भावेर ता. शिरपूर यांना हातेड येथून ताब्यात घेऊन त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली .

Leave A Reply

Your email address will not be published.