पारोळ्याजवळ अपघात, एक ठार, चार जखमी

0

पारोळा :– येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विचखेडा गावाजवळ कारने ट्रॅक्टरला धडक दिल्याने त्यात एक जण जागीच ठार झाला तर चार जखमी झाल्याची घटना दि 11 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सुरत येथून बाभूळगाव  ता धरणगाव येथे आज हळद व उद्या पुतण्याचे लग्न असल्याने प्रल्हाद धुडकू पाटील वय 55,त्यांचा मुलगा नरेश प्रल्हाद पाटील 35,सून सोनाली नरेश पाटील 30,नातू धृ नरेश पाटील 5,गुंजन नरेश पाटील 4,असे त्यांची एक्ससेंट कार क्र जि जे 05-जे पी-7144 वर  बाभूळगाव ता धरणगाव येथे येत असतांना महामार्गावरील पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ व्होअर टेकच्या प्रयत्नात समोरून धरणातील गाळ भरून येणार्‍या ट्रेकटरला भरधाव धडक दिली त्यात प्रल्हाद पाटील हे जागीच  मरण पावले तर मुलगा,सून,नात ,नातू हे गंभीर जखमी झालेत त्या अवस्थेत मिळेल त्या वाहनाने जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात गुंजन हिची प्रकृती चिंताजनक होती मात्र डाँक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून तिचे प्राण वाचविले तसेच सौ सोनाली ह्यांचे दोघ पाय व एक हात मोडला गेला असून नरेश व धृ यांना हाता पायांना  व डोक्यास दुखापती झाल्या आहेत त्यांच्यावर डाँ योगेश साळुंखे, डाँ सुनील पारोचे,परिचारिका एस काथार,डिंपल पाटील,राजू वानखेडे, मंगला त्रिवाने, अजय घटायडे, पूनम लोरा,यांनी प्रथमोपचार करून 108 रुग्णवाहिकेत चालक प्रमोद सूर्यवंशी, रोशन पाटील यांनी धुळे येथे पुढील उपचारार्थ हलविले आहे  याच्या फिर्यादीवरून  चालकाविरुद्ध पारोळा पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे कॉ काशिनाथ पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.