घरकुल मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील टाॅवरवर चढला युवक

0

अमरावती (प्रतिनिधी) : पंतप्रधान आवास योजनेच्या लाभास पात्र न ठरल्याने. येथील युवकांने मंगळवार 18 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील टॉवरवर चढण्याचे धाडस केले. या प्रकाराने काही  वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .

राजेश सुरेश बुरघाटे असे टाॅवर वर चढणाऱ्या युवकाचे नाव आहे . पंतप्रधान आवास योजनेत फ्लॅटसाठी 50 हजार रुपये भरावे लागत आहे .परंतु हात मजुरी करीत असल्याने ही रक्कम भरणे शक्य नाही असे त्यांने म्हटले आहे . आपण भूमीहिन आहे . कीस्तिवर फ्लॅट मीळाल्यावर किस्ता कशा भरणार  ? असा प्रश्‍न त्यांने केला आहे . याच प्रश्नाकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी .त्यांने  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालना शेजारी असणाऱ्या टॉवरवर चढण्याचा निर्णय घेतला.

तेथील पोलिसांनी त्याची समजूत घालून त्याला खाली उतरण्यास सांगितले . काही वेळात युवक टाॅवर वरुन खाली उतरला .त्यानंतर त्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले .या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.