ग.स.सोसायटीचा उत्कृष्ट पगारदारांची पतसंस्था विभागीय पुरस्कारानी गौरव

0

भडगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने ग.स.सोसायटीला उत्कृष्ट पगारदारांची पतसंस्था विभागीय पुरस्कारानी गौरविण्यात आले. नागपूर येथे दोन दिवशीय कार्यशाळेत सहकार आयुक्तांच्या हस्ते ग.स.सोसायटीला सन्मानीत आले. त्यामुळे पुन्हा एकदा संस्थेच्या पारदर्शक कारभारावर फेडरेशनकडुन शिक्का मारला गेला आहे. तर सोसायटीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नागपूर येथे नुकतेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत राज्यातील पतसंस्था, सहकारी संस्थांचे प्रतिनीधी उपस्थिती होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उटघाटन झाले. यावेळी राज्याचे सहकार आयुक्त  सतिश सोनी, अप्पर सहकार आयुक्त डाॅ.पी.एल. खंडागडे, आमदार श्री खोपडे, फेडरेशन चे अध्यक्ष दादाप्पा कोयटे आदि उपस्थिती होते. राज्यातील नागरी, ग्रामिण पतसंस्था, सहकारी नौकरांच्या पतसंस्था,मल्टीस्टेट पतसंस्था यांचे अध्यक्ष, कर्मचारी, संचालक यांना या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. सहकारातील विविध कायदे, नियम आदिविषयाबबत मार्गदर्शन करण्यात आले.

ग.स सोयायटीचा गौरव
नागपुर येथे सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट संस्थाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील ग.स.सोसायटीला  ला सर्वोत्कृष्ट पगारदारांची पतसंस्थेला विभागीय पुरस्कारांने गौरविण्यात आले. सहकार आयुक्त सतिश सोनी यांच्या हस्ते लोकसहकार गटाचे अध्यक्ष तथा सोसायटीचे संचालक विलास नेरकर , कर्मचारी नियंत्रण समीतीचे अध्यक्ष विश्वास सुर्यवंशी, कर्ज समीतीचे अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी पुरस्कार स्विकारला. कर्ज वितरण, कर्जवसुली, नगण्य एनपीए,सभासदांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना तसेच शासनाच्या विविध मार्गदर्शक सुचनांचे पालन केले म्हणून ग.स. सोसायटीला उत्कृष्ट पगारदारांची पतसंस्था म्हणून गौरविण्यात आल्याचे लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर यांनी सांगीतले.

आयुक्तांकडुन ग.स.चे कौतुक
ग.स.सोसायटीला सर्वोत्कृष्ट नौकरांची पतसंस्था म्हणून पुरस्कार मिळाल्याने राज्याचे सहकार आयुक्तांनी ग.स.सोसायटीचे कौतुक केले. ते म्हणाले की, “पतसंस्थाच्या ठेवीने जळगाव जिल्हा बदनाम झाला होता. मात्र ग.स.सोसायटी सारखी संस्था राज्यात सर्वोत्कृष्ट ठरते. हे त्यांच्या चांगल्या कामाची पावती आहे. इतरांनी आपल्या भाषणातुन ग.स.चे कौतुक केले. दरम्यान या पुरस्कारांने सोसायटीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

काही जण हेतुपुरस्पर संस्थेच्या कारभारावर बोट ठेवत संस्थेची बदनामी करतात. पतसंस्था फेडरेशनकडुन ग.स.सोसायटीला मिळालेला पुरस्कार हा संस्थेच्या पारदर्शकतेचे द्योतक आहे. आमच्या संचालक मंडळाने कायम सभासदांचे व संस्थेचे हीत जोपासण्याचे काम केले आहे.
– विलास नेरकर अध्यक्ष लोकसहकार गट

ग.स.सोसायटीत नविन गटाच्या स्थापनेनंतर फेडरेशनकडुन संस्थेला मिळालेला पुरस्कार आमच्या चांगल्या कामाची पावती आहे. सभासद हीताला व काटकसरीला अधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळातही संस्थेच्या प्रगतीची चाके अधिक गतीने फीरतील.
-मनोज पाटील अध्यक्ष ग.स.ग.स.सोसायटी जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.