ग्राहक पंचायतीच्या अधिवेशनाला बहुसंख्येने कार्यकर्ते जाणार : महाजन

0
भुसावळ (प्रतिनिधी )- आ.भा . ग्राहक पंचायतीचे अहमदनगर येथील नेवासा येथे आयोजीत मध्य महाराष्ट्र प्रांत अधिवेशनास जळगाव जिह्यातून बहुसंख्येने पादाधिकारी व कार्यकर्ते सदस्य जाणार असून याकरीता तालुकास्तरिय बैठकिंचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे वरिष्ठ सदस्य तथा ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष विकास महाजन यानी आज भुसावळ येथे आयोजित बैठकीत दिली .
स्थानिक अग्रसेन भवन येथे आयोजित बैठकिंचे अध्यक्षस्थानी विकास महाजन होते यावेळी तालुकाध्यक्षा ऍड कल्पना टेमाणी यांचेसह पदाधिकारी होते.
बैठकीस मार्गदर्शन करतांना विकास महाजन म्हणाले की ,येत्या शनिवार दि.९ व  रविवार दि.१०नोव्हेंबर २०१९ या दोन दिवशीय (एक निवासी रात्र)मध्य महाराष्ट्र प्रांताचे वार्षिक अधिवेशन निश्चित केलेले आहे. श्री संत नागेबाबा सभागृह. मु.पो.भेंडा ता.नेवासा. जि.अहमदनगर या ठिकाणी अधिवेशन होणार आहे . अधिवेशनास जळगाव जिल्ह्यातून किमान  200 च्यावर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  अधिवेशनाचे यजमान आहेत “अहमदनगर जिल्हा.”अहमदनगर जिल्ह्याने अधिवेशनाची तयारी जवळजवळ पूर्ण केली आहे. आज  मंगळवार दि.१५ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळ तालुका ग्राहक पंचायतीची बैठकीत भुसावळ तालुक्यातून नेवासा येथे होणाऱ्या प्रांत अधिवेशनात सहभागी होण्याबाबत चर्चा  करण्यात आली .तसेच प्रकाश फेगड़े यानी दिलेल्या एल जी कंपनीचे वाशिंग मशीन संदर्भात आलेल्या तकरारिवर चर्चा विनिमय करून फसवणूक करणाऱ्यावर योग्य कारवाई बाबत निर्णय घेण्यात आला भुसावळात लवकरच ग्राहक मेळावा घेण्याबाबत चर्चा, 25 ऑक्टोबर जिल्हा बैठक यासह विविध विषयांवर चर्चा झाली . तसेच नविन सदस्य नोंदणी व पादाधिकारी यांची नियुक्ति करण्यात आली .यामध्ये भुसावळ तालुका संघटक पदी उज्वला बागुल , व सहसंघटक पदी हर्षल गोराडकर यांची नियुक्ति करण्यात आली . नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांचेसह उपस्थितांनी अभिनंदन केले सूत्रसंचलन ऍड कल्पना टेमानी व आभार सचिव ऍड जास्वदी भंडारी यानी मानले .
फोटो .

Leave A Reply

Your email address will not be published.