ग्राहक पंचायतच्या आराेग्य समिती राज्याध्यक्षपदी माेहरीर

0

जळगाव : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य समिती प्रमुखपदी विजय मोहरीर यांची नियुक्ती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी केली अाहे.

 

राज्यातील आयएमए अाणि ग्राहक पंचायत यांची टीम तयार करून त्यामाध्यमातून रुग्णांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य आयएमए यांच्याशी संपर्क साधला जाणार आहे. मोहरीर हे गेल्या ३० वर्षांपासून ग्राहक पंचायतीचे कार्य करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील चालणाऱ्या अपप्रवृत्तीवर त्यांनी कायम आवाज उठवलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य देखील आहेत. तसेच अनेकदा ग्राहक न्यायमचाच्या लोक अदालतीवर पॅनल सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे, असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने कळविले अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.