ग्राहकांना दिलासा ; पेट्रोल-डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला हा निर्णय

0

मुंबई : देशात इंधन दर स्थिर आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असली तरी देशांतर्गत इंधन दरात कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. इंधन दर स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज सलग आठव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आज मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे.

कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे. सहा दिवसांपूर्वी पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले होते.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ८४ हजार ६५७ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात २२ लाख ९१ हजार ४२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.