ग्रंथालयांनी ज्ञानस्त्रोत वाढविण्यावर भर देणे गरजेचे – दिलीप पाटील

0

जळगांव;- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम कायद्यात सर्वच गोष्टींना महत्व आले आहे. यामुळे ज्ञान अपडेट करण्याची जबाबदारी देखील ग्रंथालयांवर पडलेली आहे. तेव्हा सर्व ग्रंथालयांनी ज्ञानस्त्रोत वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनी केले.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्र आणि लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स स्टडी सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने घ्महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 आणि ग्रंथपालांची भूमिकाङ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना श्री.पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर होते. यावेळी व्यासपीठावर व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.एस.टी.इंगळे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक प्रा.मोहन खेरडे, प्रा. विजय कांची उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले की, नवीन विद्यापीठ कायद्यात विद्यार्थी केंद्राला अधिक स्थान दिले आहे. त्यासोबतच ग्रंथालयाचेही ज्ञानस्त्रोत केंद्र म्हणून नामकरण झाले यामुळे ग्रंथालयांना महत्व आले आहे तेव्हा संशोधनाला अधिक वाव मिळण्यासाठी ग्रंथालयांना अपडेट राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेचे बिजभाषक प्रा.मोहन खेरडे यांनी शिक्षकांना शिकविण्यासाठी लायब्ररी कडून मदत मिळते. सध्या ग्रंथपालांना प्रशासक, शिक्षक आणि संशोधक म्हणून भूमिका पार पाडावी लागत आहे. या स्टडी सर्कल कडून शौक्षणिक कार्य व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात प्रा. माहुलीकर म्हणाले की, ग्रंथालय ही एक पर्वणी आहे ज्यामुळे विद्यार्थी व समाजाचे ज्ञान वाढते. आजचे युग हे इंटरनेटचे असले तरी ग्रंथालयाचे महत्व कमी झालेले नाही तेव्हा विद्यार्थी जे मागतो ते पुरवा त्याची मागणी टाळू नका, मागण्यापेक्षा देण्याचे काम करा यामुळे ग्रंथालयाचे महत्व वाढतच राहणार आहे. ग्रंथालयाद्वारे विद्यार्थी घडविण्याचे कार्य देखील होत आहे. पुढील येणाज्या काळात शिक्षण ऑनलाईन होणार आहे यासाठी ज्ञानस्त्रोत केंद्राची महत्वाची भूमिका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुपारच्या सत्रात मु.जे.महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.विजय कांची यांनी आयआरएस आणि ईटिडी या विषयावर मार्गदर्शन केले. उमवि कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयातील 70 पेक्षा अधिक ग्रंथपाल यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यशाळा आयोजनामागची भूमिका प्र.संचालक डॉ.अनिल चिकाटे यांनी मांडली. सुत्रसंचालन प्रा. श्रीराम दाऊदखाने यांनी तर आभार डॉ.सुधीर पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.