गोळीबार प्रकरणी संशयीताची जामिनावर सुटका

0

भुसावळ (प्रतिनिधि)-  किरकोळ कारणावरून वाद उफाळल्याने रेल्वे हॉस्पीटलजवळील कब्रस्थानाजवळ एकावर गोळी झाडण्यात आल्याची घटना 9 जुलै रोजी रात्री साडेसात वाजता घडली होती.

या प्रकरणी संशयीत आरोपी राजकुमार खरातसह अमोल उर्फ चिन्ना खिल्लारे यांच्याविरुद्ध शहर पोलिसात भादंवि 307, 395, 143, 147, 120 ब, 323 व 504 तसेच कलम शस्त्र कायदा कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी चिन्ना खिल्लारे यास शहर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आरोपीतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण आर.पाल यांनी जामीन अर्ज सादर केल्यानंतर न्या.आर.आर.भागवत यांच्या न्यायासनापुढे त्याची सुनावणी झाली व 14 डिसेंबर रोजी आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला. आरोपीतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण पाल तर सरकारतर्फे अ‍ॅड.एस.डी.सोनवणे यांनी युक्तीवाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.