माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना मास्क वाटप

0

फैजपूर ;- :मागच्या ७ ते ८ महिन्यांपासून कोरोना मुळे असंख्य लोक बाधित झाले. अजून अनेकांना कोरोनाची लागण होत आहे.मार्च महिन्यापासून मागच्या महिन्यापर्यंत शाळा, महाविद्यालये बंद होती.परंतु आता मागच्या महिन्यापासून शासनाच्या आदेशानुसार शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली आहे.त्यामध्ये ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. अश्या या परिस्थितीत शाळा व्यवस्थापन त्यांच्या दृष्टीने शक्य ते प्रतिबंधात्मक उपाय योजना करत आहे.हाच उद्देश्य लक्षात घेऊन फैजपूर चे माजी नगराध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व श्री.निलेश उर्फ पिंटू  राणे यांच्या संकल्पनेतून आज फैजपूर शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोना पासून संरक्षण मिळावे या हेतूने मास्क वाटप करण्यात आले. आज सकाळी श्री.निलेश भाऊ राणे यांनी स्वतः फैजपुर शहरातील शाळांमध्ये फिरून मास्क वाटप केले व शाळांमधील कोरोना वरील प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा आढावा घेतला. फैजपूर शहरातील म्युनिसिपल हायस्कूल व कुसुमताई मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालयात मास्क चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांना .पिंटू राणे,तसेच मुख्याध्यापक,शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिंटू  राणे मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.