गिरीश महाजनांनी आधी हिंदुत्व सिध्द करावे, मग बोलावे: गुलाबराव पाटलांचा टोला

0

जळगाव – ‘ज्यावेळी बाबरी मशिदीचा ढाचा ढासळला, तेव्हा भाजपच्या 72 नेत्यांनी बाबरीचा ढाचा आम्ही पाडला, हे तेव्हा का कबूल केले नाही. गिरीश महाजन यांनी आधी याचे उत्तर द्यावे, मग हिंदुत्त्व सिद्ध करावे’, अशा शब्दांत शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे.

पुढे पाटील म्हणाले की, भाजपाच्या 72 नेत्यांनी तेव्हा बाबरीचा ढाचा आम्ही पाडला, हे का कबूल केले नाही. तेव्हा एकच बाप होता बाळासाहेब ठाकरे; ज्यांनी सांगितले पाय नाही हात आहे, हात नाही पाय आहे, याचे उत्तर गिरीश महाजन यांनी द्यावे, असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.चित्रा वाघ यांच्या टीकेचाही घेतला समाचार -भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईत घडलेल्या वादाच्या विषयावरून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. त्यांच्या टीकेचाही गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला. ‘शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंची जाहीर सभा असते, तेव्हा स्त्रीला सन्मान देऊन बाहेर काढले जाते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा नजराणा म्हणून आणले होते, तेव्हा अशीच आमची माता असती तर आम्ही किती सुंदर राहिलो असतो, असे छत्रपतींनी सांगितले होते. त्या महाराजांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहे. त्यामुळे चित्रा वाघांनी सर्कशीतल्या वाघासारखे ज्या लोकांच्या बाबतीत टीका केली आहे, त्या भगिनीला माझी विनंती आहे. कोणत्याही भगिनीवर शिवसैनिक वार करणार नाहीत. जो गोंधळ झाला, तेव्हा शिवसेनेकडूनही महिला होत्या आणि भाजपकडूनही महिला होत्या. भगिनींना पाहून हल्ला झाला, असे नाही. मी या प्रकाराला मान्यता देऊ शकत नाही’, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

गिरीश महाजनांनी काय केली होती टीका? -भाजपा नेते गिरीश महाजन यांनी काल जळगावात असताना राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. ‘शिवसेना आपल्या मूळ तत्वांपासून बाजूला जाऊन अशी भरकटेल, असा आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता. काँग्रेस व एमआयएमच्या पुढे जाऊन शिवसेनेने हिंदुत्व विरोधी काम करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेची इतकी अधोगती कधीही झाली नाही, ती आज बघत आहोत’, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी टीकास्त्र डागले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.