गिरडच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदर करून मित्राला दिला निवृत्तीचा निरोप

0

भातखंडे (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या जवाहर हायस्कूल गिरड व कनिष्ठ महाविद्यालय येथील सन १९९३- ९४ चे इयत्ता १०वी चे माजी विद्यार्थी तब्बल २८ वर्षांनंतर एकवटले निमित्त मात्र वेगळे होते त्यांच्या वर्गात शिकणारा माजी विद्यार्थी किशोर जगतापराव पाटील  राहणार गिरड  तालुका भडगाव हे ३०जून  १९९९ला बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स मध्ये नोकरीस  असणारा त्यांचा मित्र त्याचा अलीकडेच वीस वर्षे चार महिने  प्रदीर्घ देशसेवा करून सेवानिवृत्त झालेत ते १४१ बटालियन बीएसएफ  मध्ये असताना  जम्मू-काश्मीरमध्ये  पंधरा वर्षे होते,  मेघालयात तीन वर्षे होते, हजारीबाग येथे  एक वर्ष होते, अशा विविध ठिकाणी देशसेवा करत असताना त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल  त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते असे गुणग्राहक किशोर पाटील  यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रम सर्व बॅचमेट एकत्र येऊन साजरा करण्याचे ठरले.

त्यानुसार त्याचा निवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात त्याचे सर्व माजी विद्यार्थी मित्रांनी आपल्या सह परिवारासह एकत्र येऊन त्यांनी त्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला निवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम त्याच्या आईचा सत्कार उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी केला तद्नंतर माजी विद्यार्थी सहकारी मित्राला व त्यांच्या सहचारिणी ला भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार केला यावेळी गतकाळातील २८ वर्षाच्या त्यांच्या सर्व स्मृती जागृत झाल्या या कार्यक्रमात त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता इतका आनंद त्यांना झाला होता यावेळी झाला  कार्यक्रम प्रसंगी  जमलेल्या सर्व माजी विद्यार्थी व  सर्व परिवाराने गीत गायनाच्या कार्यक्रमात  देखील सहभाग घेतला नंतर  सहभोजनाचा कार्यक्रमाचा लाभ  घेतला.असा अनोखा कार्यक्रम या माजी विद्यार्थ्यांनी येथे घडवून आणला आणि एक आदर्श निर्माण केला.

Leave A Reply

Your email address will not be published.