गरुड महाविद्यालयातील डॉ. रोहिदास गवारे हे इंडियन एक्सलन्स अवॉर्ड 2021चे मानकरी

0

शेंदूर्णी – येथील अ. र. भा. गरुड महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉ. रोहिदास गवारे यांना, गीना देवी रिसर्च इन्स्टिट्यूट भिवानी, हरियाणा तर्फे वर्ष 2021 चा इंडियन एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

त्यांनी रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी पदी मागील तीन वर्षात विभिन्न समाजोपयोगी उपक्रम राबविले आहे तसेच सध्या महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा समन्वयक पदी कार्य करीत आहे.त्यांनी पीएच.डी.तसेच दोन लघु शोध प्रकल्प पूर्ण केले आहे.एकूणच त्यांच्या शिक्षण, संशोधन, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्या बद्दल हा गौरव करण्यात आला.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजय गरुड, सचिव सतिष चंद्र काशिद, सहसचिव दिपक गरुड, संचालिका उज्वला सतिष काशिद, संचालक सागर काका जैन, संचालक यु.यु.पाटील, प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर वृंदांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.