गंगाआश्रम सह पाच धार्मिक स्थळांचा होणार विकास –

0

गुरु पौर्णिमा निमित्त खासदार उन्मेष पाटील यांनी दिली ग्वाही

चाळीसगांव – राजदेहरे गंगाआश्रम, संत जनार्दन नामसाधना जुनपाणी आश्रम ,श्रावणतळे मंदिर ,करगाव रोड येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर तसेच शहरातील स्वामी समर्थ मंदिराचा लवकरच पर्यटन स्थळ विकास कार्यक्रमात समावेश करून कोट्यावधीचा निधी आश्रमासाठी लवकरच एक कोटीचा निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करून प्रयत्नशील आहे.अशी ग्वाही खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.

गुरुपौर्णिमेच्या निमित्त राज देहरे येथील गंगाआश्रम व जूनपाणी येथील संत जनार्दन स्वामी नामसाधना आश्रमावर भेट देऊन साधू-संतांचे आशीर्वाद घेतल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत उमंग समाज महिला परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील, शिंदीचे माजी सरपंच गोरख राठोड, पिंपळगावचे माजी सरपंच संतोष देशमुख, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब राऊत, महिला आघाडीच्या अध्यक्षा नमो ताई राठोड ,ग्रामपंचायत अनिल चव्हाण यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी भाविक शिष्यगण उपस्थित होते काल सोमवार रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रुद्रेश्वर महादेव मंदिर, गंगाआश्रम (राजदेहेरे) येथे आयोजित व्यासपूजेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते. या सत्संग समारोहाची सांगता काल गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दुपारी महाप्रसादाचे आयोजन करून करण्यात आली. याप्रसंगी खासदार उन्मेष दादा पाटील यांनी आश्रमास भेट देऊन ब्रम्हलीन स्वामी गंगानंदगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेल्या रुद्रेश्वर महादेव मंदिरात जाऊन महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन नंतर प.पू. रामप्रकाशनंदगिरीजी महाराज यांचा आशीर्वाद घेतले आणि आश्रमाच्या विकासाबाबत महाराज व उपस्थित भाविक भक्तांशी व स्वयंसेवक संवाद साधला. या आश्रमाचा खानदेशात नावलौकिक असून गुरूच्या चरणी लिन होण्यासाठी दरवर्षी हजारो लोक गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असतात. आज या धार्मिक सोहळ्याला खासदार उन्मेष पाटील व संपदा पाटील यांनी सपत्नीक हजेरी लावत भाविकांच्या आशीर्वाद घेतले.
यावेळी माजी पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब राऊत ,दिलीप राठोड, कैलास राठोड , जनार्दन ढोणे, लीलाबाई आडे, दिलीप ढोणे, रोहिदास महाराज, सागर फटांगडे, काशिनाथ सोनवणे,

आश्रमात अधिक सोयी सुविधा मिळणार

पर्यटन विभागाच्या वतीने चाळीसगाव तालुक्यातील बहाळ (ऋषीपांथा), सायगाव (बगळी देवी), वडगाव (वटेश्वर), बेलदारवाडी (ज्ञानेश्वर माउली आश्रम) आदी ४ तीर्थक्षेत्रांना २ कोटी ८० लाखांचा निधी त्यात मौजे बहाळ येथील श्रीक्षेत्र ऋषीपांथा येथे विकासकामे करणे (१ कोटी), मौजे सायगाव येथील श्रीक्षेत्र बगळीदेवी मंदिर परिसरात विकासकामे करणे (८० लक्ष), मौजे श्रीक्षेत्र वडगाव लांबे येथील वटेश्वर महादेव मंदिर परिसर विकास करणे (५० लक्ष), श्रीक्षेत्र बेलदारवाडी येथील ज्ञानेश्वर माउली आश्रम येथे विकासकामे करणे (५० लक्ष) आदी कामांना मंजुरी मिळाली आहे. याच धर्तीवर खान्देश मधील भाविक प्रिय राजदेहरे गंगा आश्रम , जूनपाणी परिसरात आध्यात्मिक शक्तीचे केंद्र असलेले संत जनार्दन स्वामी नाम साधना आश्रम निवासी तथा गोक्रांती भूषण, युवा संन्याशी १००८ महामंडलेश्वर मुक्तानंद गिरिजी महाराज आश्रम, श्रावण तळे पूज्य श्रीनाथ महाराज तसेच करगाव रस्त्यावरील इच्छापूर्ती गणेश मंदिर व स्वामी समर्थ केंद्र परिसरात भाविकांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी या पर्यटन क्षेत्र विकास निधी साठी शिफारस करण्यात येणार आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्व आध्यात्मिक केंद्राचा भाविकांना जास्तीत जास्त लाभ घेता यावी ही प्रामाणिक भावना असल्याची भावना खासदार उन्मेष दादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

आध्यत्मिक केंद्रातून संस्कार पाझरतो — १००८ महामंडलेश्वर मुक्तानंद गिरिजी महाराज
जूनपाणी गोशाळा ही जिल्ह्यामध्ये सर्वात सुसज्ज आणि रमणीय वातावरणातील गो शाळा आहे. येथे निरंतर आध्यात्मिक कार्यक्रमातून भाविकांना संस्कार दिला जातो आहे. या भागातील भौगोलिक स्थिती पर्यटन विकासासाठी पोषक आहे. या केंद्रांचा विकास झाला तर अधिकाधिक संस्कार नव्या पिढीला देता येणार आहे. आज खासदार उन्मेष पाटील व संपदा पाटील यांनी सपत्नीक भेट दिल्याने पुढील काळात नक्कीच येथील विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा मुक्तानंद महाराज यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.