खिरवड येथे तरुणाची आत्महत्या

0

रावेर | तालुक्यातील खिरवड येथे एका तरुणाने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. जितेंद्र ज्ञानेश्वर गाढे (वय ३४) असे या तरुणाचे नाव आहे.

जितेंद्र गाढे याने आपल्या राहत्या घरी सकाळी ६.३० च्या सुमारास छताच्या पत्र्याला लावलेल्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. गावातील शांताराम रामु गाढे यांनी दिलेल्या खबरीवरुन याबाबत रावेर तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. कॉ. जितेंद्र नारेकर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.