#व्हिडीओ : खडसेंवर अन्याय हा पूर्ण लेवा समाजाचा अपमान – कुटुंबनायक रमेश विठु पाटील

0

“नाथाभाऊंना सन्मानपूर्वक स्थान द्यावे

माजी मंत्री खडसेंना पहिल्या यादीत तिकीट न देणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध –

दुसर्या यादीत सन्मानपूर्वक स्थान न दिल्यास मोठा निर्णय घेणार

भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांची प्रतिक्रिया

भुसावळ (प्रतिनिधी )-  सलग सहा टर्मपासून आमदार राहिलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना भाजपाने जाहीर केलेल्या 125 उमेदवारांच्या यादीत स्थान न दिल्याने भाजपा सरकारचा आम्ही सर्व भोरगाव लेवा पंचायती च्यावतीने निषेध करत आहोत तसेच  दुसर्या यादीत खडसेंना सन्मानपूर्वक स्थान न दिल्यास संपूर्ण बॉडीला विश्वासात घेवून पुढील भूमिका जाहीर करू, अशी माहिती भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिली.

जामनेर रोडवरील हॉटेल मल्हारमध्ये त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधतांना कुटुंबनायक रमेश विठू पाटील पाटील म्हणाले की, भोरगाव लेवा पंचायत ही संघटना सामाजिक असून तिचा राजकारणाचा संबंध नाही मात्र खडसे हे लेवा समाजाचे नेते आहेत व आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. सलग 40 वर्षांपासून भाजपाचे काम करणा-या  खडसें सारख्या ज्येष्ठ नेत्यांना भाजपाने पहिल्या यादीत स्थान न देवून  समाजाचा एकप्रकारे अपमानच केला आहे. गेल्या 3 वर्षापासुन खडसेंवर अन्याय होत आहे . ना किमान दुस-या  यादीत स्थान देवून आता सरकारने प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खडसेंना दुस-या यादीत तिकीट न मिळाल्यास संपूर्ण कार्यकारिणी यामध्ये 21 सदस्य व 8 सल्लागार अश्या समिती सदस्याना विश्वासात घेवून आम्ही निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

40 वर्षापासुन एकनिष्ठ आहेत त्यांनी आजपर्यंत स्वतः तिकीट वाटप केले  आहे व संपूर्ण महाराष्ट्रात चांगले दिवस आणले आहे . मात्र आज  त्यांचेवरच ही वेळ आली आहे ही सुद्धा अपमानजनक बाब आहे.

दुसऱ्या यादीची प्रतिक्षा

संपूर्ण समाज हा नाथा भाऊ यांच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे , खडसेंवर अन्याय हा  पूर्ण लेवा समाजाचा अपमान  आहे.   जवळपास राज्यातील जळगाव , भुसावळ , विदर्भ, पुणे, नागपुर, नाशिक , कल्याण, डोंबिवली, ठाणे यासह अन्य भागात समाज नाराज झाला आहे .   दुसऱ्या यादीत जर पुन्हा त्यांचेवर अन्याय झाला तर संपूर्ण लेवा समाज हा खडसें घेतील त्या  निर्णयाच्या पाठीशी राहतील .

पत्रकार परीषदेला अॅड.प्रकाश पाटील, डॉ.बाळू पाटील, पंचायतीचे सदस्य डॉ.नरेंद्र कोल्हे, सुहास चौधरी, मंगला पाटील, आरती चौधरी, गिरीश नारखेडे आदी भुसावळसह पाडळसेतील पंच मंडळी उपस्थित होती.

रोहिणी खडसेंना उमेदवारीऐवजी खडसेंना उमेदवारी हा आमच्यासाठी जास्त सन्मानाचा विषय आहे ऐसे म्हणत नेमका समाज काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता  कायम ठेवली.

यावेळी पत्रकार परीषदेलाविभागीय अध्यक्ष  अॅड.प्रकाश पाटील, डॉ.बाळू पाटील, बामणोद येथील  पंचायतीचे सदस्य डॉ.नरेंद्र कोल्हे, सुहास चौधरी, मंगला पाटील, आरती चौधरी, गिरीश नारखेडे आदी भुसावळसह पाडळसे येथील पंच मंडळी उपस्थित होती.

Leave A Reply

Your email address will not be published.