भाजपाने नाथाभाऊंना पहिल्या यादीत स्थान न दिल्यामुळे समाजाचा अपमान – रमेशदादा पाटील

0

भोरगाव लेवा पंचायततर्फे भाजपचा निषेध

भुसावळ । भाजपने सोमवारी आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना डावलल्यामुळे भोरगाव लेवा पंचायततर्फे भाजपचा निषेध करण्यात आला. आज भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबप्रमुख रमेशदादा विठू पाटील यांनी भुसावळ येथील हॉटेल मल्हारमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपचा तीव्र शब्दात निषेध केला.

आ. खडसे यांची उमेदवारी पहिल्या यादीत जाहिर न झाल्याने खान्देशात मोठी संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.  यामुळे कालच खडसे समर्थकांनी आपला रोष व्यक्त केला असून अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. नाथाभाऊंनी भाजपच्या वाढीसाठी अथक प्रयत्न केले असून समाजानेही या पक्षाला आजवर साथ दिली आहे. मात्र आता भाजपने तिकिटांच्या पहिल्या यादीत स्थान न देऊन नाथाभाऊंचा आणि पर्यायाने समाजाचा अपमान केला असल्याचे रमेशदादा पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.