खडसेंच्या पक्षांतरामुळे एरंडोल तालुक्यात राष्ट्रवादीला बळ मिळण्याची शक्यता

0

एरंडोल : – एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतरामुळे एरंडोल तालुक्यात भाजपाच्या संघटनेत अल्प प्रमाणात पडझड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे खडसेंच्या समर्थकांकाचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद मिळणार आहे अशी राजकीय वर्तुळातून चर्चा होत आहे.

एरंडोल तालुक्यात कासोदा आडगाव जिल्हा परिषद गटातील उज्वलाताई मच्छिंद्र पाटील ह्या एकमेव भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत तसेच भाजपाचे रमेश सिंग परदेशी हे एरंडोल नगर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळीत आहेत ही मोठी जमेची बाजू आहे याशिवाय भाजपाचे चार नगरसेवक आहेत ग्रामीण भागात काही ग्रामपंचायतीचे सरपंच व इतर संस्थांचे पदाधिकारी भाजपाचे आहेत विशेष हे की एरंडोल पंचायत समितीवर भाजपाचा एकही सदस्य नाही.

एरंडोल तालुक्यात भाजपाच्या पक्षसंघटनेत एकनाथराव खडसे यांना मानणारे काही कार्यकर्ते आहेत नाथाभाऊ मुंबईहून मुक्ताईनगर ला परत आल्यावर त्यांचे समर्थक त्यांची भेट घेऊन पक्षांतराबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत अशी माहिती राजकीय गोटातून पुढे आली आहे भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने याबाबत दुजोरा दिला आहे साधारणपणे दिवाळीनंतर तालुक्यातील नाथाभाऊ चे समर्थक हाताला “घड्याळ” बांधतील असा सूर उमटत आहे.

दरम्यान भाजपाचे जनजातीय महाराष्ट्र राज्य क्षेत्र प्रमुख एडवोकेट किशोर काळकर हे खडसेंच्या पक्षांतराचे भाजपातील डॅमेज कंट्रोल कसे रोखणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

भाजपाच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांचा विश्वास पक्ष संघटनेवर व पक्षनेतृत्वावर असून ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत नरेंद्र मोदी,अमित शहा व महाराष्ट्र प्रदेश भाजपा यांच्यावर आमचा विश्वास व निष्ठा असल्याचे भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष एस आर पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान भाजपाचे एरंडोल येथील काही कार्यकर्ते खडसे यांच्या मुंबई येथील पक्षांतराच्या समारंभाला हजेरी लावण्यासाठी गेले होते असे समजते एकंदरीत खडसे यांच्या पक्षांतरा मुळे भाजपात जी थोडीफार पडझड होणार आहे ती दिवाळीनंतर स्पष्ट होणार आहे….

Leave A Reply

Your email address will not be published.