मुंबई : राज्यातील भाजपच्या नेर्तृत्वावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. परंतु त्या आधी भाजपचे माजी नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली आहे. दरम्यान त्यांच्या या भेटीची महाजन यांनी स्वतःच याविषयी पत्रकारांना माहिती दिली. तसेच ही कामानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटल्याचंही स्पष्टीकरण दिलं. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या महाजन यांनी मुख्यमंत्र्यांशी नेमकी काय चर्चा केली, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहे.
गिरीश महाजन म्हणाले, “एकनाथ खडसे कामानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटू शकतात. मीही आज (10 डिसेंबर) मुख्यमंत्र्यांना भेटलो. कामासाठी भेटले तर त्यात काहीही चुकीचं नाही.” एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्ष सोडणार नाहीत. त्यांची लवकरच नाराजी कमी होईल. ते नेमके कोणावर नाराज आहेत हे माहिती नाही, असंही गिरीश महाजन यांनी नमूद केलं.