कोविंड रुग्णालयाचा असाही प्रताप

0
जळगाव | प्रतिनिधी 
 सलार नगर मधील एका पुरुषाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने रविवारी ३१ तारखेला सकाळी तो स्वतःहून हॉस्पिटलला जाऊन ऍडमिट झाला संध्याकाळी त्याचे स्वैप घेण्यात आले त्या स्वैप चा अहवाल न येताच सोमवारी रात्री आठ वाजता त्याला ॲम्बुलन्स मधून सिविल मधून गर्ल्स हॉस्टेल मधील कोविड सेंटरला ऍडमिट करण्यात आले
 सकाळी त्यांचा फोन जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांना आला असता त्यांनी त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला का याबाबत तपासणी व पाहणी केली असता रुग्णांचा अहवाल अद्याप आलेला नाही असे अधिकृत सूत्रांनी माहिती दिल्यावर सदर बाब कोविड रुग्णालयाचे डॉक्टर विजय गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली व एका चांगल्या रुग्णाला तुम्ही कोविड
 रुग्णा सोबत रात्रभर ठेवलेले आहे व अद्याप तो त्याच  ठिकाणी आहे अशी तक्रार भ्रमणध्वनीद्वारे केली व  लेखी मेसेज टाकले.  सदर रुग्णाने सुद्धा सकाळी मनपाचे वैद्यकीय अधिकारी यांना तक्रार केली की माझा रिपोर्ट आला नसताना सुद्धा मला पॉसिटिव रुग्णा सोबत का ऍडमिट करण्यात आलेले आहे त्यावर त्यांनी उत्तर दिले कि पॉझिटिव्ह आला असेल म्हणूनच तुम्हाला याठिकाणी पाठवण्यात आलेल्या आहे तेव्हा त्यांनीही सहनिशा करून  या रुग्णास पुनश्च सामान्य रुग्णालयात पुढील मॅनेजमेंट साठी पाठवले.
 सदर  प्रकारा बाबत प्रत्यक्ष रुग्ण, डॉक्टर विजय गायकवाड तसेच डॉक्टर सुयोग चौधरी यांच्या निदर्शनास फारुक शेख यांनी आणून दिली व या चांगल्या रुग्णास त्याचा अहवाल प्राप्त न होतात कोविंड रुग्णास सोबत पाठवून दिले रात्रभर तिथे ठेवण्यात आले यास जबाबदार कोण ? संबंधिता ची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे अशी मागणी केली असता डॉक्टर विजय गायकवाड यांनी सदर प्रकार हा कसा झाला? का झाला? याची चौकशी करतो असे तोंडी आश्वासन दिले.
 परंतु जर असाच प्रकार या कोविड हॉस्पिटल मध्ये होत असेल तर चांगले अथवा सस्पेक्टेड रुग्ण हे  पॉझिटिव्ह रुग्ण सोबत ठेवून पॉझिटिव्ह करण्यात रुग्णालयाचा  मोठ्या प्रमाणात संबंध दिसून येत आहे व त्यामुळेच मृत्यूचे प्रमाण सुद्धा राज्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याची  तक्रार फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे. सदर रुग्णास पुनश्च एडमिट केले असून रिपोर्ट आल्यावर पुढील कार्रवाई करु असे आश्वासन दिले.  सदरची तक्रार त्यांनी माननीय जिल्हाधिकारी जळगाव व माननीय आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सुद्धा सादर केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.