कोळी समाजाच्या कर्मचाऱ्यांवरील कारवाईस स्थगिती द्या !

1

आ चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील कोळी, महादेव कोळी, मल्हार व टोकरे कोळी जमातीतील कर्मचाऱ्यांवर जात प्रमाणपत्र वैधता कारणास्तव सद्या सुरू असलेली बडतर्फ कारवाई तूर्तास थांबविण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. राज्यात सुमारे 40 ते 50 हजार कोळी समाजातील कर्मचाऱ्यांना जात प्रमाणपत्र वैधता कारणास्तव नोकरी गमवावी लागणार आहे. संबंधित समाज बांधव नैसर्गिक रित्या अन्याय होत असून कृपया पुढील कारवाई थांबवावी, अशा मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोड यांची उपस्थिती होती.

आमदार पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर मतदारसंघात रहिवास करत असलेले महाराष्ट्र राज्यातील कोळी, महादेव कोळी व  मल्हार कोळी जमातीला भारतीय घटनेने अनुसूचित जमातीचे आरक्षण मंजूर असून संदर्भाधीन सामान्य प्रशासन शासन निर्णय क्रमांक बीसीसी 2018 /प्र.क्र. 308/ 16 ब, दिनांक 21. 12 .2019 शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र कारणास्तव कर्मचाऱ्यांना नोकरीतील बडतर्फ करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सुमारे 40 ते 50 हजार कोळी समाजातील कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. संबंधित कोळी जमात बांधवांवर नैसर्गिक रित्या अन्याय होणार आहे. तरी कृपया तोपर्यंत उपरोक्त शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांवर करण्यात येणारी कारवाई तूर्तास थांबवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

1 Comment
  1. Anjali Ghantewar says

    ऐडीटर महोदया मॅडम मला महत्त्वाची सूचना द्यायची आहे

Leave A Reply

Your email address will not be published.