कोरोना विषयी फलकलेखनातून जनजागृती

0

पाचोरा (प्रतिनिधी) : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना या आजाराने प्रत्येक मानवप्राण्याची झोप उडवली आहे. कोरोना हा आजार कुणालाही होऊ नये यासाठी आपल्या शासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागल्या आहेत. तसेच भारतातील कलावंत मंडळी सुद्धा आपल्या कलेच्या माध्यमातून कोरोना विषयी जनजागृती करत आहे. त्या कलावंतांपैकीच पाचोरा येथील पाचोरा शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूलचे कलाशिक्षक सुबोध कांतायन हे सुद्धा जनजागृतीत मागे राहिले नाहीत. यांनी कोरोना विषयी फलक लेखन केले. त्यात त्यांनी वृत्तपतत्रातून प्रसिद्ध झालेली बातमी त्यात वाघिणीला ही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला.

या बातमीचाआधार घेऊन मानवावर जसा या विषाणू चा परिणाम होतो तसा माणसांमुळे ही प्राणीमात्रावरही हा कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो म्हणून यात वाघिणीला दाखविण्यात आले आहे व शासनाने दिलेली लक्ष्मण रेषा प्रत्येक धर्माने, जातीने, श्रीमंत असो की गरीब या सर्व मानवांनी सर्वांनी ते नियम पाळलेच पाहिजेत. त्यात अजून लक्ष्मणरेषा ओलांडतांना पाऊल दाखविले आहे. ओलांडल्यावर त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे प्रतीकात्मक स्वरूपात चित्रात दिसून येते. यात लॉक दाखविले असून त्यात असलेल्या चावीची दिशा ही खाली दर्शविण्यात आली म्हणजेच लॉकडॉउन हा प्रतीकात्मक अर्थ त्याचा निघत आहे.

कोरोना विषयी फलकलेखनात कुठल्याही धर्माचा, जातीचा असला तरीही, तो व्यक्ती श्रीमंत असो की गरीब असला तरीही, आणि तो मानव असो की वन्य जीव असला तरीही त्यास कोरोना या विषाणू चा संसर्ग होऊ शकतो. जर आपण शासनाने दिलेल्या नियमांचा म्हणजेच लक्ष्मण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास आपण आपला जीवच नाही तर आपल्या मातृभूमीलाही खूप मोठे नुकसान पोहचवू शकतो. या अगोदर ही सुबोध कांतायन यांनी  विद्यार्थ्यांसाठी व परिसरातील नागरिकांसाठी, झाडे लावा झाडे जगवा, बालदिन, शिक्षक दिन, विठ्ठल दर्शन, छत्रपती शिवाजी महाराज, फटाके मुक्त दिवाळी, प्लॅस्टिक मुक्त भारत, नव वर्ष संदेश, महिला दिन अशा अनेक विषयांवर जन सामान्यांना प्रबोधन होईल असे फलक लेखन करीत असतात. सुबोध कांतायन यांनी आपण सर्वांनी या कोरोना विषाणू पासून आपल्या मातृभूमीला वाचविण्याचे आवाहन केले आहे. आपण सर्वांनी आपल्याला, आपल्या कुटुंबाला, आपले राष्ट्र, देश आणि या वसुंधरेला वाचविण्यासाठी सरकारला लॉक डाऊन होऊन सहकार्य करावे. रंगश्री आर्ट च्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन पर विविध चित्रकृती विद्यार्थ्यांकडुन साकारून घेत असतात. सोबतच शिक्षकांनी “वर्क फ्रॉम होम” या संकल्पनेला ही चालना देऊन विद्यार्थ्यांना कलेच्या विविध विषय देऊन त्यांना मिळाले ल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. विद्यार्थी ही कलाकृती निर्माण करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.