मुक्ताईनगरातील मजूराकडून दुसऱ्यांदा भोजनदान

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजूर ,गरीब तसेच बाहेरगावाहून येणाऱ्याचे लॉक डाऊनलोड खाण्यापिण्याचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येक जण आपल्या  परिस्थितीनुसार मदतीचा हात देत आहे. अश्या पद्धतीने मुक्ताईनगर शहरातही एका मजूरातर्फे दुसऱ्यांदा भोजनदान करण्यात आले आहे. त्यामुळे हा आदर्श इतरांनी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमन एड. रोहिणीताई खडसे खेवलकर तसेच  मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. नजमा इरफान तडवी यांच्या हस्ते  भोजनदान  वितरित करण्यात आले .अन्नदाते यांच्याकडून किराणा माल,अन्नधान्य, भाजीपाला यांचे संकलन करून वंदे मातरम ग्रुपतर्फे धनंजय सापधरे ,शुभम तळेले, राहुल सुरपाटणे ,राहुल माळी ,आशिष भंसाली , स्वप्निल श्रीखंडे ,अमरदीप पाटिल , सुमित बोदडे ,शुभम काठोके, हरिहर पाटिल या तरुण संकलनकर्त्यांच्या मदतीने गरजूंना अन्नदान करण्यात येते.

आज गरीब आणि मजूर असलेल्या रऊफ खान बाबू खान यांच्यातर्फे भोजनदान देण्यात आले. आजचे अन्नदाते रऊफ खान यांच्या घरची परिस्थिती जेमतेम असतानाही एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी लॉकडाऊन काळात गरजूंना आज दुसऱ्यांदा भोजनदान केले आहे. आज धुळे येथून पायदळ येणाऱ्या आणि बडनेराकडे जाणाऱ्या मजूर वर्गाला भोजनदान करण्यात आले. इतकेच नाही तर मुक्ताईनगर शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालय तसेच बोदवड चौफुली याठिकाणी असलेल्या गरीब गरजू यांना भोजनदान देण्यात आले दररोज घरचे जेवण हॉटेल वेदांतचे संचालक भिलाभाऊ वाणी हे मोफत स्वतः तयार करून देतात. या उपक्रमाबद्दल सर्व तरुणांचे तसेच रउफ खान आणि वन्देमाताराम ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.