कोरोना : महाराष्ट्रातील मृत्यूदर हा देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक

0

मुंबई :- देशासह राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णाची संख्या महाराष्ट्रात आहे. त्याचबरोबर करोना रुग्णांचा महाराष्ट्रातील मृत्यूदर हा देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. देशात करोनामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण हे ३.२४ इतके आहे, तर महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण ३.७१ टक्के इतके असल्याचे दिसून आले आहे. जगामध्ये हा मृत्यूदर ६.९६ टक्के इतका आहे.

करोनामुळे देशात २,२९३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी ८६८ महाराष्ट्रातील आहेत. आत्तापर्यंत जगात २ लाख ७८ हजार ८९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण ७०,७५६ जणांना करोनाची लागण झाली असून, राज्यात २३ हजार ४०१ बाधित आहेत. देशातील विविध राज्यांमधील मृत्यू दराच्या विश्लेषणामध्ये पश्चिम बंगालचा क्रमांक सर्वात वरचा आहे, तेथील मृत्यू दर ९.२१ टक्के इतका आहे, तर गुजरातमध्ये हे प्रमाण ६.०१ टक्के इतके आहे. मध्य प्रदेशमध्ये हे प्रमाण ५.८४ टक्के तर कर्नाटकमध्ये ३.६० टक्के, हिमाचल प्रदेशमध्ये ३.३९ टक्के आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.