कोरोना पासुन बचावासाठी रिक्षाचालकाची अनोखी बांधीलकी

0

पारोळा | प्रतिनिधी

राज्यासह जिल्हयात व तालुक्यात कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता शासन “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या अभियातुन रोज नागरीकांची आरोग्य तपासणी करुन कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन करित आहे.या पाश्वभुमीवर कायद्याचे नियमांचे पालन करुन आँटो रिक्षा यांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आल्याने याबाबत प्रवाश्यांची रिक्षेत काळजी घेतली जावी,आपला रोजगार देखील सुरळीत रहावा या भावनेतुन शहरातील “महाजन भाऊ “रिक्षा चालकाने प्रवाश्यांच्या हितासाठी रिक्षेलाच प्लाँस्टीक पाईप बांधुन यात सँनेटायझर टाकुन  पुढच्या भागात नळाची तोटी बसवुन “हात धुवा  रिक्षात बसा ” असे आवाहन करित असल्याने शहरात रिक्षा चालकाच्या अभिनव कल्पकतेचे कौतुक होत असुन श्री महाजन यांची कल्पकता डोळ्यासमोर ठेवुन अनेक व्यावसायिकांनी ग्राहक हिताचा विचार करित कोरोना काळात आवाहन करण्याची गरज असल्याचे नागरिकातुन बोलले जात आहे.

गेल्या २०वर्षापासुन महाजन भाऊ म्हणजे आनंदा तुकाराम महाजन रा.जुलुमपुरा ( साई नगर,पारोळा ) ह्या युवकाने मनाशी जिद्द बाळगत रिक्षा व्यवसायातुन नवी भरारी घेण्याचा प्रयत्न केला.”शरीराची ठेवणी तशी रिक्षांचा नेहमी लुक बदलवित चर्च राहणारे महाजन” यांनी सुरुवातीला गावात रिक्षा व्यवसाय केला.गेल्या पाच ते सहा वर्षापासुन शाळकरी विद्यार्थी वाहतुक करित असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव मुळे विद्यार्थी अभावी उद्योगाला मुकावे लागले मात जिद्द उराशी बाळगुन मिळेल त्यात समाधान मानुन प्रवाश्यांचे हित जोपासण्याची कला आज महाजन ह्या युवा रिक्षा चालकाने जिवंत ठेवल्याने शहरात “महाजन भाऊ रिक्षावाले “असे नाव कामाच्या उभारीतुन आनंदा याने मिळविले आहे.

सध्या कोरोनामुळे बरेच प्रवाशी खाजगी वाहनाने प्रवास करित आहे.मात्र आपला रिक्षा व्यवसाय वाढावा व लोकांनी कोरोना बाबत काळजी घ्यावी या भावनेतुन स्वखर्चातुन रिक्षालाच प्लाँस्टीक पाईप बसवित यात सँनेटायझर टाकुन लोकांना हात धुवुन रिक्षात बसविण्याचे सांगुन अश्या भयावह परिस्थिति नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन महाजन भाऊ म्हणजेच आनंदा महाजन करित असल्याने शहराच सर्वदुर त्याच्याच रिक्ष्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असुन सर्वजण त्यांचे कौतुक करतांना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.