कोरोनाने मयत रुग्णाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आता भाजपा उचलणार ; आ. गिरीष महाजन

0

जामनेर प्रतिनिधी : तालुक्यातील सरकारी व खाजगी हॉस्पिटल मध्ये कोरोनाने मयत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून  हॉस्पिटलचे बिल,तसेच औषध  इत्यादीचा खर्च करणे सर्व सामान्य नागरिकांना अवघड झाले आहे.आणि अशा परिस्थितीत कोरोनाने जर रुग्ण मृत्यू पावला तर अंत्यसंस्काराचा परत खर्च हा पेलवल्या जात नाही. आणि म्हणून कोरोनाने मृत्यू  पावलेल्या रुग्णाच्या अंत्यसंस्कारा साठी लागणारा सर्व खर्च आता  नातेवाईकांना करण्याची गरज नसून तो सर्व खर्च जामनेरमध्ये भारतीय जनता पार्टी करणार असल्याचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले.

यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र रमेश पाटील ,ज्येष्ठ नेते श्रीराम महाजन, नपा गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे,भाजपा शहराध्यक्ष अतिश झाल्टे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, बाबुराव हिवराळे, धोंडू पाटील, सुहास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.