कोरोनाची अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई

0

पुणे | कोरोना रोगाबाबत चुकीची माहिती किंवा अफवा सोशल मीडियावर पसविण्याची उठाठेव काही जणांकडून सर्रासपणे केली जात आहे. आता मात्र अशा अफवा व चुकीची माहिती पसरविणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी सायबर पोलिसांनी अशा व्यक्तींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
कोरोना व्हायसरच्या बाबतीत सोशल मिडीयावरून अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा निर्माण होत आहे. परिणामी नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हॉट्‌स ऍप, फेसबुकवर कोरोना संदर्भात अफवा पसरविणारे अनेक मेसेज कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता फॉरवर्ड केले जात आहेत. याची पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.