कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सावधानता बाळगा : शिवसेना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे

0

भुसावळ (प्रतिनिधी)- मागील काही दिवसापांसून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. भुसावळ शहरात वाढत असलेली कोरानाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावसाठी आता सर्वांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे, त्यामुळे सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे  यांनी केले आहे.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार अनेक ठिकाणी नागरिकांना कोरोना महामारी पासून वाचण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सुद्धा जिल्ह्याच्या संरक्षणाठी विविध नियम लागू करण्यासह उपाययोजना आखल्या आहेत.

 

सध्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वांनी प्रतिबंधक उपायांचा अंमल करावा व आपल्या कुटुंबाची तसेच समाजाची काळजी प्रत्येकाने घ्यावी, या आजारापासून सावध राहण्यासाठी समस्त नागरिकांनी वारंवार हात धुणे, मास्क लावल्याशिवाय घराबाहेर न पडणे, खोकला – सर्दी – ताप अशी लक्षणे असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. सध्या नागरिक आवश्यक ती खबरदारी न घेता बिनधास्त वागत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी बेजबाबदार पणे न वागता कोरोनापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन बबलू बऱ्हाटे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.