कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेतर्फे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य तसेच विद्यानंद ऍग्रो बारामती यांचा संयुक्त विद्यमाने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

स्पर्धेतील विषय छत्रपती शिवाजी महाराजांचे संघटन कौशल्य,छत्रपती शिवाजी महाराजांचे यांची कृषी धोरणे,शिवकालीन जलसंधारण,छत्रपती शिवाजी महाराज यांचे महिला धोरण आदी असणार आहेत.स्पर्धेत सहभागी होण्याकरिता विडिओ पाठविण्याचा कालावधी १५ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान आहे.स्पर्धकांच्या वक्तृत्वाचा व्हिडिओला युट्युब या समाज माध्यमावर मिळणाऱ्या दर्शक संख्या तसेच पसंतीवरून योग्य स्पर्धकांची निवड केली जाणार असून प्रथम पारितोषिक ५००१ रुपये,द्वितीय पारितोषिक  २१११ रुपये,तृतीय पारितोषिक ११११ रुपये तसेच उत्तेजनार्थ ५ पारितोषिक आयोजकांमार्फत दिली जाणार आहेत.

 

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे पदाधिकारी श्रीकांत राजपूत ९४०४०५८५२९,अभिषेक बहिर ९०६७८४५३०२ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे,राज्य संघटक श्रीकांत राजपूत,स्पर्धा समन्वयक कृष्णा गायकवाड यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.