कोतवालाचा प्रांताधिकाऱ्यांच्या दालनासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथिल  कोतवाल प्रविण दगडू गांगुर्डे याने तलाठ्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी वरीष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी लागत असल्याने अघिकाऱ्यानी अर्ज फेटाळल्याने  प्रांत अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आल्यानंतर साहेब महत्त्वाच्या कामात आहेत दहा मिनिटांनंतर भेटण्याची वेळ दिली असल्याचे सांगितल्याने त्याचा राग येवून कोतवालाने प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनासमोर एक लिटरच्या बाटलीत पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोतवालाजवळ पेटवून घेण्यासाठी माचीसच नव्हती, या कोतवालाने यापूर्वी सन २००९/१० मध्येही प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
कळमसरा ता. पाचोरा येथील कोतवाल प्रविण दगडू गांगुर्डे यास तात्कालीन तलाठी भरत परदेशी यांनी दि. १/१/१८ रोजी जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचे सांगुन कोतवाल गांगुर्डे याने तलाठी परदेशी यांचे विरोधात पिंपळगाव हरे पोलिस ठाण्यात अॅट्रासीटिचा गुन्हा दाखल होण्यासाठी अर्ज दिखल केला होता. मात्र कोतवाल शासकीय कर्मचारी असल्याने अॅट्रासीटि दाखल होण्यासाठी वरिष्ठांची परवानगी लागते कोतवाल गांगुर्डे याने अनेक तलाठ्यांवर व गावकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेले असल्याने व गावकऱ्यांनी त्याचे विरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या असल्याने प्रांत अधिकाऱ्यांनी त्याचा अर्ज फेटाळून लावला. माझा अर्ज का फेटाळून लावला हे विचारण्यासाठी कोतवाल गांगुर्डे हा दि. २२ रोजी प्रांत कार्यालयात आला होता मात्र प्रांत अधिकारी कामानिमित्त बाहेर गेले होते, दि. २३ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान गांगुर्डे याने शिपायास साहेबांना भेटण्याचा आग्रह धरला त्यावर शिपायाने साहेबांनी दहा मिनिटांनंतर भेटण्याची वेळ दिल्याचे सांगितले . कोतवाल गांगुर्डे यास त्याचा राग येवून उप विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्या दालनासमोर हातातील पेट्रोलची बाटली अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी समोरच असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी धावत येऊन त्यास पोलिस ठाण्यात जमा केले.

Leave A Reply

Your email address will not be published.