कृषी कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शेंदुर्णीत बंद !

0

शेंदुर्णी, ता.जामनेर (प्रतिनिधी) : केंद्र सरकार नव्याने आणत असलेल्या व शेतकऱ्यांना त्रासदायक असलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आज शेंदुर्णीत राष्ट्रवादी, शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस म्हजेच महाविकास आघाडीच्या वतीने बंद,रास्तारोको करुन पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. बंदला शेंदुर्णीत १०० टक्के प्रतिसाद मिळाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोदी सरकारच्या विरोधात ,या कृषी कायद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पदाधिकारी, कार्यकर्ते रेल्वे स्टेशन परिसरात पोहचले. या ठिकाणी रस्तारोको करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते सागरमल जैन, शिवसेनेचे सिद्धेश्वर पाटील, सुनील गुजर,राष्ट्रीय काँग्रेस चे सचिन गरुड,रोहितदादा पवार विचार मंच चे रविंद्र गुजर यांनी मोदी सरकार आणत असलेल्या व शेतकऱ्यांना नुकसान कारक असलेल्या या कृषी कायद्याच्या विरोधात आपल्या भाषणात जोरदार टिकास्र सोडले व हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष भैय्या गुजर,राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष श्रीराम काटे,जेष्ठ नेते किशोरदादा पाटील, सुधाकर बारी,शांताराम गुजर,नंदकिशोर बारी,शंतनु गरुड, योगेश गुजर,डॉ. सुनील अग्रवाल, बारकु  जाधव ,फारुख खाटीक,शकुर शेख,विजय पाटील, अजय निकम तसेच राष्ट्रवादी, शिवसेना तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पोउनि. किरण बर्गे यांना यावेळी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पहुरचे पोनि.राहुल खताळ,पोउनि किरण बर्गे तसेच पोलिस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.  आजच्या बंदमुळे एस.टी.बसेस,खाजगी बसेस बंद होत्या,बाजारपेठेतही शुकशुकाट होता.

Leave A Reply

Your email address will not be published.