किरकोळ कारणावरून तिघांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

0

जळगाव :- सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या कारणावरून जयश्री अशोक शिंदे यांना मारहाण केल्या प्रकरणात विनोद उर्फ दीपक बाळकृष्ण वाणी, रूपाली विनोद वाणी व सोनाली रवींद्र न्हायदे (सर्व रा.इंद्रप्रस्थनगर) यांना शुक्रवारी न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा सुनावली.

10 जुन 2017 रोजी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या कारणावरून जयश्री शिंदे यांना विनोद वाणी, त्याची पत्नी रूपाली वाणी व सोनाली न्हायदे यांनी वाद घालून मारहाण केली होती़ त्यानंतर शिंदे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ नंतर हा खटला न्या़ व्ही़एचख़ेडकर यांच्या न्यायालात चालला़ याप्रकरणात सरकारपक्षातर्फे अ‍ॅड़ सुप्रिया क्षीरसागर यांनी 9 साक्षीदार तपासले़ अखेर याप्रकरणी शुक्रवारी न्या़ खेडकर यांनी निकाल दिला़ तिघा संशयितांना आरोपी ठरवून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली तर प्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला़ दंड न भरल्यास 1 महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे़ याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड़ सुप्रिया क्षीरसागर यांनी कामकाज पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.