कासोदा येथे 50 नागरिकांची रॅबिट अंटीजेंन टेस्ट

0

कासोदा, ता.एरंडोल (प्रतिनिधी) :  कासोदा येथील पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत कडून दिनांक 4 मे मंगळवारी पहिल्याच दिवशी कासोदा बिर्ला चौकात 30 नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली.तसेच रात्री पण रजा मेडिकल जवळ 20 जणांची तपासणी करण्यात आली त्यासाठी कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही या कारवाईमुळे कासोदा पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतचे कौतुक केले जात आहे

राज्य शासनाने संचारबंदी लागू केली असली तरी अजूनही कासोद्या शहरात नागरिक मोठ्या संख्येने विनाकारण फिरत आहेत. या विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चाप बसावा यासाठी आता प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. कासोदा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे, पोलिस, ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने ही कार्यवाही सुरू आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता कासोद्या शहरातील बिर्ला चौकात अशा ३० नागरिकांची जागेवरच टेस्ट करण्यात आली. काही बेशिस्तांवर यावेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली. सुदैवाने यावेळी कोणीही करोना पॉझिटिव्ह आढळले नाही. यापुढेही ही कार्यवाही दररोज करण्यात येणार असून पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या नागरिकांची एरंडोल येथील कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती सपोनि रविंद्र जाधव यांनी दिली.

त्याप्रसंगी आरोग्य उपकेंद्राचे लॅब टेक्निशियन शाहिद मुल्लाजी, राजेश बोरसे,  ग्रामपंचायत कर्मचारी तुषार मोरे, विलास पाटील, ज्ञानेश्वर खैरनार, तसेच पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव, पो.ना.शरद राजपूत, पो.कॉ. नितीन पाटील, पो.कॉ. प्रवीण हटकर, पो.कॉ.दत्तू पाटील,  पो.का.स्वप्नील परदेशी सह होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.