काय म्हणतात जळगावकर…

0

मित्रांनो, लॉकडाऊनच्या काळात आपल्याला प्रत्येकाला स्वतःचा बचाव करतांना स्वतःला समजून घेता आलं असेल. आपल्याला आपलं महत्त्व पटलेलं असणार.कित्येकांनी याचा अनुभव घेतला असेलच. आज आपण लॉककडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये आहोत. हा स्वतःला घरात कोंडून घ्यायचा कोंडमारा असह्यही झाला असेल.   आज सोबत सर्व मंडळी आहेत. आजी-आजोबापासून नातवापर्यंत. अशावेळी आपण एकमेकांशी संवाद साधून, नातवांनी आजी-आजोबांकडून, कुणी आपल्या आई-वडिलांकडून आपल्या जीवनाचा प्रवास कसा झाला, हे जाणून घेतलं असेल. या प्रवासाचा फायदा आपल्याला आपल्या भविष्यात होईल का ? याचा विचार केला असेल. मोबाईल इंटरनेट आणि टीव्हीवर वेळ घालवला असेल. मात्र हे जीवन नाही. आपण इतर कश्यात तरी आपलं मन रमवलं असेल. त्यामुळे हा काळ आपणास सुसह्य झाला. या कठीण परिस्थितीतही आपण शांत व संयमी राहू शकलात. त्यासाठी  लॉकडाऊनमध्ये आपण काय केलं ते इतरांना कळू द्या. आपला अनुभव लिहून आमच्याकडे (74989 49201) या क्रमांकावर पाठवा. योग्य लिखाणास आम्ही प्रसिध्दी देवू. या पुढील काळातही आपला हाच अनुभव जगायला बळ देईल. आपल्याला पुन्हा एकदा स्वतःला उभं करण्यासाठी, देशाला परत एकदा रुळावर आणण्यासाठी.

भरत चौधरी
निवासी संपादक,
दै.लोकशाही, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.