कहो दिल से रक्षा ताई फिरसे “,च्या गजरात भाजपच्या संपर्क कार्यालयाचे भुसावळात उद्घाटन

0

महायुतीचा ठाम निर्धार 5 लाखांचे मताधिक्य मिळवणार
कामाला लागा गाफिल राहु नका – रक्षा खडसे

भुसावळ- पुन्हा मोदींना पंतप्रधान करावयाचे आहे याकरिता सर्वानी एकत्र या . मोदींच्या सक्षम हातात नेतृत्व देण्याकरिता सर्वानी कामाला लागायचे आहे अनभिज्ञ वा गाफील राहू नका , नियोजनबद्ध, सूत्रबद्ध व सूक्ष्मरीत्या काम करा , विरोधकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ,असे आवाहन उमेदवार रक्षा खडसे यांनी केले . भाजपा शिवसेना रिपाई , रासप व शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचार कार्यालयाचे भुसावळ येथे उद्धघाटन संपन्न झाले यावेळी त्या उपस्थित महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना रक्षा खडसे बोलत होत्या . २३ एप्रिल या तारखेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत काम करायचे आहे .५ अंक हा आपल्या सर्वांकरिता शुभ संकेत असून २३ मार्च म्हणजे बेरीज पाच व निकाल २३ मे बेरीज पाच तेव्हा जोमाने व उत्साहाने कामाला लागा विजय आपलाच आहे, सर्वाधिक मताधिक्याने विजय आपलाच निश्चित आहे मात्र हयगय करू नका असे ठाम मत व्यक्त करीत कार्यकर्त्यांना आवाहन केले .तसेच पक्षसंघटनेचा आदेश पाळावाच लागतो . असे म्हणत आमच्या सोबत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्ये सोबत असल्याचे स्पष्ट केले.

ढोलताश्यांच्या गजरात रक्षा खडसे यांच्या हस्ते रावेर लोकसभा मतदार संघातील येथील भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय (आठवले गट ) व रासप व शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार श्रीमंती रक्षा निखिल खडसे यांच्या भुसावळ येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक ५ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ८ वाजता जामनेर रोड वरील दर्डा भवन अक्सिस बँक येथे संपन्न झाले. यावेळी प्रचार कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सह थोर नेत्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले . रक्षा ताई आज बढो हं तुम्हारे साथ है!, महायुतीचा विजय असो , ” कहो दिल से रक्षा ताई फिरसे “, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता .

प्रसंगी आमदार सावकारे सर्व बूथ प्रमुखानी नियोजनांवर लक्ष केंद्रित करा, सर्वाधिक मताधिक्या करिता एके एक मत महतवाचे आहे याकरिता भ्रमात राहू नका , तसे अफवांवर विश्वास ठेवू नका , कार्यकर्त्यांनी सजग व सतर्क राहायचे आहे असे आवाहन केले . तर नगराध्यक्ष रमण भोळे, शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी शहर प्रमुख मुकेश गुंजाळ , रिपाईचे रमेश मकासरे, प्रा डॉ सुनील नेवे , जीप उपाध्यक्ष नंदू महाजन , रोहिणी खेवलकर आदींनी मनोगत व्यक्त केले .

तर महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांना विविध समाज घटक व संघटनांनी पाठींबा दिला आहे यामध्ये कोळी समज महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सैंदाणे यांनी लेखी पत्र दिले . तरराजपूत एकलव्य सेना राजेंद्र साळवी व महिला आघाडीच्या सुमन साळवी यांनीही पाठिंबा दिला .
यावेळी व्यासपीठावर उमेदवार खा .रक्षा खडसे ,आ . संजय सावकारे अॅड .रोहिणी खडसे , नगराध्यक्ष रमण भोळे ,प्रा .डॉ सुनिल नेवे , पल्लवी सावकारे , वंदना उन्हाळे , अलका शेळके , अंजली नेवे , युवराज लोणारी,उपनगराध्यक्ष नजमा तडवी, निवृत्ती पाटीळ, प्रिति पाटील, शैलजा पाटील, रमेश मकासरे, हाजी शेख शफी पहेलवान ,रजनी सावकारे ,लक्ष्मी मकासरे ,मेघा वाणी ,शैलजा पाटील , राजश्री नेवे , भारती वैष्णव , मुन्ना तेली ,सुधाकर जावळे, पुरषोत्तम नारखेडे ,मुकेश गुंजाळ ,प्रमोद सावकारे ,प्रमोद नेमाडे ,अनिकेत पाटील, सतिष सपकाळे ,किरण कोलते ,राजेद्र नाटकर, पिंटू कोठारी ,पिंटू ठाकूर, लक्ष्मण जाधव ,देवा वाणी, अमोल इंगळे ,निळकंठ भांरबे ,दिपक धांडे ,वसंत पाटील, खुशाल जोशी, राजेंद्र चौधरी, पवण बुंदेले ,रमाशंकर दुबे ,वासु बोंडे ,किरण चोपडे ,संघदिप नरवाडे , पप्पु सुरडकर, बाळा सोनवणे, प्रा दिनेश राठी , अर्जुन खरारे, राजु खरारे,बाळासाहेब सैदाने , राजेंद्र साळवे शिवसेना नगरसेवक माजी शहर प्रमुख मुकेश गुंजाळ ,राकेश खरारे ,उमाकांत शर्मा, युवासैनिक मिलिंद कापडे,जेष्ठ शिवसैनिक अबरार शेख, हेमंत ख़बायत, दत्तू नेमाड़े, धिरज वार्डोनकर, नितेश मिश्रा, बाबु शेफर्ड, संतोष गुजर, फरहान शेख वैभव चंदन विक्की राजपूत इत्यादी शिवसैनकासह भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय (आठवले गट ) व रासप महायुतीच्या सर्व पदाधिकारी व नगरसेवक , जि प सदस्य , पंचायत समिती सदस्य , सरपंच व कार्यकर्ते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.