मोदींनी पवार परिवाराची चिंता करण्याऐवजी लाल कृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांची चिंता करावी

0

गुलाबराव देवकर यांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा मोदींवर घणाघात


एरंडोल, प्रतिनिधी दि. 5 –
राष्ट्रवादी काँग्रेस एकट्या दुकट्याचा पक्ष नाही लाखो कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून मजबूत झालेला असा हा पक्ष आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी आमच्या पक्षाची व आमच्या पवार परिवाराची चिंता न करता त्यांनी लालकृष्ण अडवाणी, मनोहर जोशी यांची चिंता करावी, असा मार्मिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे मारला. यावेळी आ. डॉक्टर सतीश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन विजय महाजन यांनी केले.
एरंडोल येथे फुले विद्यालयाच्या पटांगणावर दि. 5 शुक्रवार रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते खा. शरद पवार यांनी पंडित जवाहलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी लालबहादूर शास्त्री, मनमोहन सिंग या पंतप्रधानांनी केलेल्या कामाबाबत प्रशंसा केली. ज्यांना आपल्या देशाचा इतिहास, भूगोल माहित नाही त्यांच्याकडे देशाची सूत्रे देऊ नका. ज्यांना घराचे काही माहीत नाही त्यांनी घर कसे चालवावे? हे सांगणे हास्यास्पद प्रकार आहे अशी टीका खा. शरद पवार यांनी केली. तसेच भाजपा सरकार ज्या वेळेला सत्तेवर आली आपल्या देशावर सीमेपलीकडून सर्वाधिक हल्ले करण्यात आले तरी मोदी साहेब म्हणतात की माझी 56 इंच छाती आहे हा प्रकार जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारा आहे. चार वर्षात मोदी सरकारने विकास कामाची वाट लावली असून त्यांना पूर्णपणे अपयश आले आहे, अशी टीका त्यांनी केली. या निवडणुकांमध्ये देशात परिवर्तन करायचे आहे स्वातंत्र्यानंतर अनेक पंतप्रधान झाले सर्व जाती-धर्माच्या घटकांना विश्वासात घेऊन देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला यांनी त्यांच्यावर टीका करून देशाची दिशाभूल केली आहे. जणू त्यांनी देशासाठी काही केले नाही असा खोटारडेपणा मोदी यांनी केला आहे. गेल्या दोन वर्षात अकरा हजार 998 शेतकरी आत्महत्येचा घटना घडल्या त्यांना राज्याची फडणवीस सरकार जबाबदार असून या सरकारला कोणती शिक्षा द्यायची? असा सवाल पवार यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर लोकसभेचे उमेदवार गुलाबराव देवकर, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी माजी खा. वसंतराव मोरे, माजी आ. शिरीष चौधरी, माजी आ.अरुण पाटील, माजी आ. संतोष चौधरी माजी आ. दिलीप वाघ, माजी आ. राजीव देशमुख माजी आ. मनीष जैन आणि माजी आ. दिलीप सोनवणे मा. खा. ईश्वरलाल जैन, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ.संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक प्रदेश सरचिटणीस ललिता पाटील, डी.जे. पाटील, खलील देशमुख, प्रदीप पवार, राधेश्याम चौधरी, जगन सोनवणे, मुकुंद सपकाळे, अनिल भाईदास पाटील, अशोक खलाने, उमेश देसले, संजय पवार, संजय गरुड, वाल्मीक पाटील, लिलाधर तायडे, विलास पाटील, विजय महाजन, अमित पाटील, प्राध्यापक मनोज पाटील, राज पवार, ज्ञानेश्वर महादेव महाजन, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.