कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान

0

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नॅशनल हायवे क्र.सहाचे चौपदरीकरणाचे काम कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतले असुन बेलाड फाटा बहापुरा शिवारात कंपनीने दगडांपासुन गिट्टी, सिमेंट आदी मिक्सिंग मशनरी टाकल्याने उडणाऱ्या धुळीमुळे प्रदुषण निर्माण होऊन या प्रदुषणामुळे पिकांची वाढ खुटल्याने त्याचा परीणाम होणाऱ्या उत्पनावर होत असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने लोकशाही मार्गाने नुकसान भरपाई मिळावी म्हणून आज तहसील कार्यालयासमोर मधुकर रामभाऊ निकम, इंदुबाई सखाराम गोळे, संतोष शिवाजी बाबर, भावेश पांडुरंग इंगळे, विनोद सुदाम इंगळे, शेषराव धोंडीराम इंगळे, पद्माकर धोंडीराम इंगळे, नानाराव धोंडीराम इंगळे, सुमनबाई उदेभान इंगळे, निर्मलाबाई गिरधारी मोरे, वच्‍छलाबाई निनाजी गोळे, रमाबाई बाबुराव पवार, रामदास निवृत्ती इंगळे, सुपडा श्रीराम सुरडकर, विश्वनाथ भिकाजी सावळे, माणिकराव दामभाऊ उमाळे ,संतोष शत्रुघन भदाले यांनी आमरण उपोषणाला सकाळी अकरा वाजेपासुन सुरुवात केली आहे. या उपोषणाला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेटी देऊन पाठींबा दर्शविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.