कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करा

0

अमळनेर (प्रतिनिधी)- कर्नाटकातील बेळगांव मनगुत्ती गांवातील छत्रपती शिवाजी राजे यांचा पुतळा पुन्हा त्या जागेवर तातडीने पुनर्स्थापना करावा व पुतळा हटवला म्हणून कर्नाटकातील भाजपा शासनाचा निषेध करून अमळनेरात महाविकास आघाडी तर्फे तहसीलदार अमळनेर यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली.

2 दिवसांपूर्वी बेळगावातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवरायांचा पुतळा कर्नाटकातील भाजपाच्या स्थानिक प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात रात्रीतून हलवला त्यामुळे कर्नाटक सह महाराष्ट्रात त्याचे शिवप्रेमी नागरिकांमध्ये तिव्र पडसाद उमटले ,आज अमळनेर शिवसेना,कांग्रेस,व राष्ट्रवादी काँग्रेस ह्या महाविकास आघाडीतर्फे भाजपातील येदुरुप्पा सरकारचा तिव्र पडसाद म्हणून पदाधिकारी यांनी निषेधार्थ घोषणा देऊन तहसिलदार यांना निवेदन देऊन छत्रपती राजेंचा पुतळा पुन्हा त्या जागेवर स्थापना करावा अशी मागणी केली.

तसेच शिवसेनेचे उपनेते व पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्यावर नारायण राणे यांचे थिल्लर सुपुत्राने जे घाणेरडे आरोप केलेत त्याचा निषेध करून नामदार गुलाबभाऊ हे शिवसेनेचे निष्ठावंत मावळे असून शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत,तुमच्या राणे परिवारा सारखे दलबदलू कावळे नाहीत, ह्यापुढे आरोप करतांना विचार करा अन्यथा शिवसैनिकाशी आपली गाठ आहे असा ईशाराही राणे पुत्रांना दिला.

सदर प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील,शहरप्रमुख संजय पाटील,श्रीकांत पाटील युवासेना उपजिल्हा अधिकारी, महेश देशमुख तालुका संघटक, मुक्तार खाटिक शहराध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस, सुनील शिंपी शहराध्यक्ष रा.विध्यार्थी काग्रेस, श्रीनाथ पाटील ता.अ.वि.राष्ट्रवादी कांग्रेस, भरत पवार, सुभाष देसले राष्ट्रवादी कांग्रेस, देवेन्द्र देशमुख माजी उपजिल्हाप्रमुख, नितीन निळे माजी शहरप्रमुख, प्रताप शिंपी नगरसेवक,संजय भिल नगरसेवक, जिवन पवार, मोहन भोई,उपशहरप्रमुख चंद्रशेखर भावसार शहर संघटक,
वाहतूक सेना रमेश पाटील,सनी गायकवाड, सुरेश पाटील सरपंच सुंदरपट्टी,हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.