‘कटप्पा’व ऐश्वर्याची जोडी येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

मुंबई : सुपरहिट चित्रपट ‘बाहुबली’ने बॉक्स ऑफीसवर बरेच विक्रम रचले. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. खास करून यामधील ‘कटप्पा’ची भूमिका साकारणारा अभिनेता सत्यराज यांना लोकांनी इतकी डोक्यावर उचलून घेतले आहे की त्यांना आता कटप्पा म्हणूनच ओळखू लागले. आता सत्यराज यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन काम करणार आहे. ऐश्वर्या कटप्पासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार मणिरत्नम यांनी त्यांच्या आगामी बिग बजेट ‘पोन्निनी सेल्वम’ चित्रपटात या साऊथ स्टारसोबत एन्ट्री केली आहे. ‘पोन्निनी सेल्वम’ या चित्रपटात सत्यराज ऐश्वर्या रायच्या पतिची भूमिका साकारणार आहे. ऐश्वर्या राय बच्चनव्यतिरिक्त अमिताभ बच्चनही चित्रपटात भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक मणिरत्नम यांनी चित्रपटासाठी बिग बी आणि ऐश्वर्या या दोघांनाही विचारण्यात आलं आहे. परंतु या चित्रपटासाठी बिग बी काय उत्तर देणार ते निश्चित नसल्याचं सांगण्यात येत आहे.

‘बाहुबली द बिगनिंग’नंतर ‘बाहुबली द कन्क्लूजन’च्या प्रदर्शनापर्यंत संपूर्ण देशात कटप्पाने बाहुबलीला का मारला? हा प्रश्न मोठ्या चर्चेचा विषय बनला होता. आता ‘पोन्निनी सेल्वम’मधून सत्यजित काय कमाल करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.